strawberry khanyache marathi fayde
- आरोग्य

स्ट्रॉबेरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. याबरोबरच शरीरासाठी आवश्यक असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम असे घटक स्ट्रॉबेरीमध्ये आज आपण जाणुन घेणार आहोत स्ट्रॉबेरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

स्ट्रॉबेरी ही दिसायला जितकी सुंदर असते. तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी खाल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत मिळते. स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म डोळ्यामध्ये मोतीबिंदू होण्यापासून प्रतिबंधित करतात आपल्या शरीराला  व्हिटॅमिन सीची योग्य प्रमाणात मात्रा मिळणे आवश्यक असते.

स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी कोलेजेन त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. स्ट्रॉबेरी खाल्ल्यानं त्वचा तजेलदार होते. वाढत्या वयानुसार त्वचेचेवर येणाऱ्या सुरकुत्या प्रतिबंधित करण्यास मदत करते.

स्ट्रॉबेरी खाल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत मिळते. स्ट्रॉबेरी खाल्याने दात अधिक चमकदार होतात. तसेच हिरड्या मजबुत होण्यास मदत होते.

स्ट्रॉबेरीमध्ये फायबर असते स्ट्रॉबेरी खाल्याने पचन सुधारण्यास मदत होते. स्ट्रॉबेरीमध्ये मॅग्नेशियम हे खनिजद्रव्य असते. त्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो, तसेच हाडं दुखण्याचा त्रासही कमी होतो.

ज्याना सांधे दुखीचा त्रास आहे त्यानी स्ट्रॉबेरीचा समावेश आपल्या आहारात करावा जेणेकरून दुखण्याचा त्रासही कमी मदत होईल. स्ट्रॉबेरी खाल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवण्यास स्ट्रॉबेरी मदत मिळते. स्ट्रॉबेरी खाल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

आपल्याला स्ट्रॉबेरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: मेडिकल न्यूज टुडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *