kokum sarbat pinyache fayde
- आरोग्य

कोकम सरबत पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे

स्वयंपाक घरात आमटी बनवताना आर्वजून वापरला जाणार पदार्थ म्हणजे कोकम! रातांबे सुकवून कोकम बनवले जाते. चवीला आंबट असलेले कोकम पित्तशामक आहे. कोकमाच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि एसिडीटी यांसारख्य़ा समस्या दूर होण्यास मदत होते.

तसंच कोकमामुळे अनेक फायदे होतात. चला तर जाणुन घेऊयात कोकम सरबत पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटामीन सी ही जीवनसत्वे मोठ्या  प्रमाणात असतात. याबरोबरच मॅगनिज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम अशी खनिजद्रव्ये ही  कोकममध्ये असतात.

कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारन्यास मदत होते बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यानी आवर्जुन कोकम सरबत पिले पाहिजे. कोकम सरबतामध्ये शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा गुणधर्म असतो. ज्याना उष्णतेचा त्रास आहे त्यानी कोकम सरबत पिले पाहिजे.

कोकम सरबत पिल्याने कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोकममध्ये असणारा हायड्रो क्रिटिक असिड हा घटक शरीरातील प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास मदत करतो.

आहारामध्ये कोकमचा नियमित वापर केल्यास पोट साफ होण्यास मदत होते. कोकम पाण्यात भिजवून ठेवावे. त्यानंतर भिजवलेले कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे. त्यात जिरेपूड आणि साखर घालावी. हे पाणी प्यायल्यानं शरीरावरील शीतपित्त दूर होईल.

नियमित कोकम सरबताचे प्राशन केल्यास पित्त विकार दूर होण्यास मदत होते. रातांब्यापासून बनवलेले कोकम सरबत हे गुणांनी आणि चवीनेही अतिशय मधुर असते.

आपल्याला कोकम सरबत पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: १ एम जि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *