ankurlele chane khanyache fayde
- आरोग्य

१ वाटी अंकुरलेले चणे खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

अंकुरलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्व असतात. चला तर जाणून घेऊयात अंकुरलेले चणे खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे. अंकुरलेल्या चणे खाल्ल्याने शरीर मजबूत होते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते.

अंकुरलेल्या हरभऱ्यात भरपूर पोषक तत्व असतात जे शरीरात उर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. आपल्याला वजन वाढवायचे असल्यास आपण रोज १ वाटी अंकुरलेले चणे खाऊ शकता. नियमितपणे अंकुरलेले हरभरे खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत मिळते. अंकुरित हरभऱ्यात फॉस्फरस आणि लोह मुबलक प्रमाणात असते.

अंकुरलेल्या हरभरा फायबरचे सेवन केल्याने चयापचय चांगले होते, आपल्याला बद्धकोष्ठता, आम्लपित्त यासारख्या समस्यांपासून देखील आराम मिळतो.

भिजवलेल्या हरभरा खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते जसे की खाज सुटणे इ. त्वचेची चमक कायम राखण्यास मदत होते. म्हणूनच आपण आपले सौंदर्य वाढविण्यासाठी हे सेवन करू शकता.

नियमितपणे अंकुरलेल्या हरभऱ्याचे सेवन करावे. हरभऱ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त मीठ काढून टाकण्यास मदत होते.

त्यामुळे मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नियमितपणे अंकुरलेले हरभरे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अंकुरलेले हरभरे नियमित खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. डायबिटीजपासून बचाव होतो.

आपल्याला अंकुरलेले चणे खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: नेटमेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *