drakshe khanyache fayde
- आरोग्य

द्राक्षे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

द्राक्षे हे खूप चवदार फळ आहे. द्राक्षांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. चला तर जाणुन घेउयात द्राक्षे खाण्याचे आरोग्यदायी फायदे. द्राक्षांमध्ये फ्रुक्टोज आणि ग्लूकोज असते जे  रक्तामध्ये सहजपणे शोषून घेतल जात, त्यामुळे त्वरित थकवा दूर होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते.

द्राक्षे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाब असल्यास आठवड्यातून तीन ते चार दिवस वाटीभर द्राक्षे खा, तुम्हाला फरक जाणवेल. द्राक्षे खाल्ल्याने लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदना व जळजळ कमी होण्यास मदत मिळते.

द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. द्राक्ष पचायला सोपी असतात. मायग्रेनचा त्रास असल्यास द्राक्षे खावीत. यामुळे डोकेदुखी दूर होते. आणि मन शांत राहते.

स्त्रियांच्या आरोग्यासाठी द्राक्ष खाणे खुप फायदेशीर आहे. कारण यामध्ये लोह, कॅल्शिअम असे रक्तवाढीसाठी उपयुक्त असणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. द्राक्षे खाल्ल्याने हाड मजबूत होण्यास मदत होते. द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.

द्राक्ष खाल्यास त्यातील विटॅमिन ‘इ’ मुळे केस गळणे व केस पांढरे होणे यासारख्या समस्या दूर होतात. सकाळी रिकाम्या पोटी द्राक्ष खाल्ले तर काही दिवसात तुमच्या शरीरातील रक्ताची कमी पूर्ण होईल. द्राक्षामध्ये लोहयुक्त घटक असतात, जे अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात.

द्राक्षे खाल्ल्याने आम्लपित्त, अपचन, ढेकर या पासून आराम मिळतो आपल्याला द्राक्षे खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: वेबएमडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *