taja usacha ras pinyache fayde
- आरोग्य

एक ग्लास ताजा उसाचा रस पिण्याचे आरोग्यदायी फायदे

ताज्या उसाच्या रसामध्ये कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, आणि अँटीऑक्सिडंट असतात. उसाचा रस प्यायल्याने शरीराला त्याचे बरेच फायदेही असतात. उसाचा रस पिल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. हृदयरोगांपासून संरक्षण करण्यास मदत होते. चला तर जाणुन घेउयात एक ग्लास ताजा उसाचा रस पिण्याचे फायदे.

उसाच्या रसामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे हाडे मजबूत होतात. उसाच्या रसामध्ये फॉस्फरस असते. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात. उसाच्या रसामध्ये सूक्रोज, ग्लूकोज असते. यामुळे उसाचा रस पिल्यावर त्वरित ताजेतवाने वाटते.

उसाच्या रसामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरीराच्या पाचक प्रणालीसाठी फायदेशीर आहे. तसेच पोटाच्या आजारांना प्रतिबंधित करतो. उसाचा रस बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करण्यास मदत करतो.

लघवी करताना जळजळ होत असेल तर उसाचा रस प्या असे केल्याने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. उसाचा रस पिताना ही खबरदारी घ्या. उसाचा रस पिण्यापूर्वी उसाचा रस ताजा आहे याची खात्री करुन घ्या. उसाचा रस स्वच्छ ठिकानीच प्या.

उसाचा रस पिताना चिमूटभर मीठ घाला. यामुळे घसा खवखवणार नाही. जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर उसाच्या रसापासून दोन हात लांबच रहा. यात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उसाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे वा करुच नये.

आपल्याला एक ग्लास ताजा उसाचा रस पिण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: नेटमेड्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *