palila dur thevnyasathi upay
- इन्फोमराठी

पालीला घराबाहेर ठेवण्यासाठी सोप्या टिप्स

पाल हा एक असा प्राणी आहे जे आपले नुकसान करीत नाही. बहुतेक भिंतींवर किंवा जमिनीवर फिरते. जर पाल अन्नात पडली तर आपले नुकसान करू शकते. घरात जर पाल असतील तर छोटे कीटक येत नाहीत. आज आम्ही तुमच्यासाठी काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या साहाय्याने तुम्ही पालीला घराबाहेर ठेवू शकता.

अंडीच्या सालापासूनही पाल पळते. अंड्याच्या सालामध्ये गंध नसला तरी अंड्याच्या सालाचा आकार पाहिल्यास, पालीला असे वाटते की काहीतरी धोकादायक आहे किंवा वेगळ्या प्रकारचे प्राणी आहे म्हणूनच ती त्याच्याकडे येत नाही. बहुतेक पाली जेथे असेल तेथे अंड्याचे शेल ठेवा. असे केल्याने पाली आसपास येणार नाही.

एक स्प्रे बॉटल घ्या. त्यात कांद्याचा रस आणि पाणी भरुन घ्या. या त्या पाण्यात लसुणचा रस मिसळा. जिथे जिथे पाल येते तिथे तो रस स्प्रे करा. पालीला हा वास असह्य होतो. पाल पळ काढते.

कांदा कापा आणि त्याला स्लाईसमध्ये लाईटजवळ टांगून द्या. यामुळे लाईटजवळ ठाण मांडून बसणारी पाल पळून जाईल. कांद्यात असणाऱ्या सल्फरमुळे त्यातून खूप दुर्गंधी येते आणि पाल पळून जाते.

घरात उपद्रवी कीटकांचा त्रास होऊ नये म्हणून डांबर गोळ्यांचा वापर करू शकता. पण यासोबतच पालींचा घरातील वावर कमी करण्यासाठीदेखील डांबर गोळ्या फायदेशीर ठरतात.

पाणी आणि काळी मिरची पावडर एकत्र करा आणि एक पेस्टीसाईड तयार करा. याला किचन, बाथरुम आणि इत्यादी ठिकाणी शिंपडून द्या. या वासाने पाल पळून जाते.

आपल्याला पालीला घराबाहेर ठेवण्यासाठी सोप्या टिप्स हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *