alyacha chaha pinyache faydealyacha chaha pinyache fayde
- आरोग्य

आल्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे

आल्याचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी एक कप आल्याचा चहा आपल्याला फक्त फ्रेशच करत नाही तर अनेक आजारांशी लढायलाही मदत करतो. चला तर जाणुन घेउयात आल्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे

कोणतेही काम करायची इच्छा वाटत नसेल तर फक्त एक कप आल्याचा चहा त्वरीत बनवा यामुळे आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळेल. आल्याचा चहा पिल्याने खोकला, सर्दी, पडसे, घसा खवखवणे वगैरे पासून तुम्हाला आराम मिळेल.

आल्याचा चहा पिल्याने तोंडाला येणारी दुर्गंधी बऱ्याच अंशी कमी होते. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आले भूक वाढविण्यात मदत करते.

आल्याचा चहा रक्ताभिसरण सुधारतो. तसेच पाचन तंत्राला अधिक चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करतो. वात, पित्ता आणि कफासारखे दोष दूर करण्यात उपयोगी असतो.

आल्याचा चहा हृदयासाठी चांगला असतो यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. आल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, त्यामुळे हृदयरोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

चहा फायदेशीर असला तरी हे विसरून नका चहामध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन असल्याकारणामुळे दिवसातुन दोन वेळा चहा पेक्षा जास्त वेळा चहा शक्यतो टाळा. आल्याचा चहा आरोग्यासाठी चांगला असला तरी कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केल्यास त्याचा त्रास होतो. म्हणून प्रमाणतच त्याचे सेवन करा.

आपल्याला आल्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: बी बी सी आणि टाइम्स ऑफ इंडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *