kadhi patyache fayde
- आरोग्य

कढीपत्याचे आरोग्यदायी फायदे

कढीपत्ता अन्नाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी  वापरला जातो. कढीपत्तामध्ये बरीच जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, प्रथिने आढळतात. कढीपत्यामध्ये अँटी-डायबेटिक, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत. जेवणाला चव आणण्या व्यतिरिक्त कढीपत्त्याचे भरपूर फायदे आहेत. चला तर जाणुन घेउयात कढीपत्याचे आरोग्यदायी फायदे.

कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर असतो. कढीपत्त्याचा वापर केस गळणे, केसांना कोंडा करणे यासारख्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी वापरले जाऊ शकतो.

कढीपत्ता पोटाचे आजार आणि पाचक प्रणालीसाठी फायदेशीर मानले जातात. जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर तुम्ही कढीपत्त्याची काही पाने चावून खाल्ली तरी चालू शकतात. त्याचा रस पोटात गेल्यामुळे तुम्हाला लगेचच आराम मिळेल.

तोंडास दुर्गंधी येत असेल तर कढीपत्त्याची पाने चावून खावीत. यामुळे जिभेवर साचलेला पांढरा थर दूर होतो, दात स्वच्छ होतात व त्यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत मिळते.

कढीपत्ता वजन कमी करण्यात उपयुक्त आहेत. कढीपत्त्यामध्ये फायबर असते जे शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करते. तुम्हाला अशक्तपणा दूर करायचा असेल तर कढीपत्ता खा. कढीपत्ता अशक्तपणा दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

कढीपत्त्याचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात हा खूप चांगला मानला जातो. हिरड्या कमकुवत होऊन दात हलत असतील तर कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट हिरड्यावर लावा यामुळे हिरडय़ांचे आरोग्य सुधारून दात मजबूत होतात.

कढीपत्त्याची पाने खाल्ल्यास रक्तातील वाढलेल्या साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. कढीपत्त्याची पाने खाण्याचे दुष्परिणाम अद्याप तरी समोर आले नाहीत.

आपल्याला कढीपत्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: नेटमेड आणि एन डी टी वि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *