bajarichi bhakri khanyache fayde
- आरोग्य

बाजरीची भाकरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आपल्या महाराष्ट्रात बाजरीचे पीक व वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारख्या अनेक घटक असतात. थंडीच्या दिवसात आपण तर बाजरीची भाकर खाल्ली पाहिजे. बाजरीची भाकर खाण्याचे बरेच फायदे आहेत.चला तर जाणुन घेउयात.

बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते. त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन केले पाहिजे. बाजरी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे जो रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे.

बाजरीमध्ये मुबलक तंतू आढळतात, बाजरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तर बाजरीची भाकर खाणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. बाजरीची भाकर खाल्ल्यानंतर फार काळ भूक लागत नाही. बाजरी वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

बाजरी ही पचन क्रियेस अगदी हलकी असते ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत. बाजरीचे नियमीत सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन केले पाहिजे.

सध्याच्या जीवनात स्नॅक्स व फास्ट फूड पदार्थ जास्त खाण्यात येतात यामुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे. लठ्ठपणा हे अनेक असे आजारांना आमंत्रित करतात. बाजरीचे नियमीत सेवन केल्याने लठ्ठपणा दूर होतो आणि चरबी ही कमी होते.

आपल्याला बाजरीची भाकरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *