khajur khanyache fayde
- आरोग्य

खजूर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

खजूरमध्ये शरीराला आवश्यक अँटिऑक्सिडेंट्स लोह, कॅल्शिअम, अमीनो एसिड, फॉस्फोरस असे उपयोगी घटक असतात. चला तर जाणुन घेउयात खजूर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे. खजूरमध्ये ‘फायबर’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. आपली पाचक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी फायबर आवश्यक असतात.

खजूरमध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट्स आपल्याला विविध प्रकारच्या आजारांपासून वाचवतात. खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे बरेच खनिजे आढळतात जी आपली हाडे मजबूत ठेवण्याचे कार्य करतात.

खजूरामध्ये फ्लोरीन नावाचे एक केमिकल असते. ज्याच्यामुळे दातांमध्ये कीड लागण्याची समस्या कमी होऊ शकते. खजूरामुळे तुमच्या हिरड्या आणि दात मजबूत होतात.

नियमितपणे २ – ३ खजूर खाल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील सुधारते. अशक्तपणा आलेला असल्यास खजूर खाल्याने फायदा होइल.

खजूर हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. नियमित २ – ३ खजूर  सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराची शक्यता कमी होते. खजुरात नैसर्गिक साखर असते.

ज्यामुळे शरीराला तत्काळ उर्जा मिळते. व्यायामानंतर लगेच खजूर खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेज येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.

खजूरमध्ये पोटॅशियम जास्त आणि सोडियम कमी असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. खजूर खाल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. यामुळे शरीराला ताकद मिळते तसेच शरीराचा लवकर विकास होतो.

आपल्याला खजूर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: मेडलाईफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *