manevaril kalvatpana yavar gharguti upay
- आरोग्य

मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

हळदी, चंदन असे उपाय करून आपण चेहरा उजळवतो. पण आपल्या मानेकडे मात्र दुर्लक्ष होत असतं. मानेची त्वचा मऊ आणि मुलायम असते. त्यावर ऊन आणि प्रदूषणाचा प्रभाव लवकर पडतो त्यामुळे मानेवर बऱ्याच  वेळा काळपटपणा येतो.

त्यामुळे चेहऱ्यासोबत मानेला सुंदर करणे फार गरजेचे आहे. चला जाणून घेऊया काही घरगुती औषधांबद्दल जे आपल्या गळ्यावरील काळेपणा दूर करण्यास मदत करतील.

गळ्यावरील काळेपणा कमी करण्यासाठी अर्धा चमचा लिंबाच्या रसात एक चमचा गुलाब पाणी घाला. हे मिश्रण गळ्यावर चांगले लावा आणि रात्रभर ठेवा. सकाळी मान स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने मानेवरील काळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

मधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण गळ्याला लाऊन अर्धा तास ठेवा. हलक्या हाताने मान मालिश करा. काही वेळाने ते धुवा. असे केल्याने सर्व घाण दूर होईल आणि मानेचा काळपटपणा निघून जाईल.

काकडी बारीक करून त्यात गुलाब पाणी घाला. आता हे मिश्रण मानेवर 10 मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे ही तुमच्या मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.

मानेचा काळपटपणा काढून टाकण्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या त्यात थोडं पाणी घालून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट मानेवर 15 मिनिट्स लावून ठेवा. असे केल्याने मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.

एक चमचा दूध आणि हळद घालून पेस्ट बनवा. याने मानेवर मालिश करा. काही दिवसातच आपल्याला फरक दिसेल. हळद आणि दुध यांच्या मिश्रणामुळे रंग उजळतो. त्यामुळे मानेवरील काळपटपणा जाऊन रंग उजळेल.

उन्हात जाण्याआधी चेहऱ्याप्रमाणेच मानेला सनस्क्रिन लावा. शरीराच्या प्रत्येक उघड्या अंगाला ऊन्हात जाण्याआधी सनस्क्रिन लावा.

शरीराच्या कोणत्याही भागावरील काळपटपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे चंदन आणि गुलाब पाणी. चंदन आणि गुलाब पाणी यांचे मिश्रण एकत्र करून ते मानेला लावा आणि कोमट पाण्याने मान स्वच्छ करा. तुमचा रंग उजळून निघाले.

मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी दोन ते तीन चमचे साखर घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून हलक्या हाताने मानेची मालिश करा. असे केल्याने आपल्या मानेवर साचलेली घाण निघून जाईल. काही वेळात मान स्वच्छ धुवा. तुम्हाला फरक जाणवेल.

आपल्याला मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडिया टुडे आणि स्टाईलक्रेझ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *