ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. ताकात व्हिटॅमिन बी-12, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे घटक असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. दररोज ताक प्याल्याने शरीरातील उष्णता कमी होते. उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी ताक पिणं फायदेशीर असत. चला तर जाणुन घेउयात ताक पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे.
ताक प्याल्याने लठ्ठपणा कमी होतो. ताक प्यायल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. ताकात फॅट्स आणि कॅलरीज कमी प्रमाणात असल्यामुळे ते लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी एक उपयुक्त पेय असे. अश्या लोकांनी नियमितपणे ताक प्यायले पाहिजे.
ताकात गूळ घालून प्याल्याने लघवी करतांना होणारी जळजळ कमी होते. ताकात पुरेशे कॅल्शियम असतं. ताक नियमित पिण्यामुळे आपल्या शरीरात असलेली कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते. ताकात थोडासा जायफळाचा कूट घालून ते प्याल्याने डोके दुखी कमी होण्यास मदत मिळते.
ताकाचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो सोबतच, पचन क्रिया देखील सुरळीत राहते. ताकात ओवा टाकून ते प्याल्याने पोटातील जंतू नष्ट होतात. मळमळ होत असल्यास एक ग्लास ताकात चिमुटभर सैंधव मीठ घालून प्यायल्याने आराम मिळतो.
जुलाब होत असतील तर ताक प्यायला देऊ शकता. कारण ताकामुळे शरीरातील पाण्याची झालेली झीज भरून निघण्यास मदत होते.
पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ताकात साखर आणि काळी मिरी घालून त्याचे सेवन करावे. असं केल्यानं पित्ताचा त्रास फारसा प्रमाणात कमी होतो.
दात येत असतांना लहान मुले सतत चिडचिड करतात अश्या परिस्थितीत, त्यांना चार ते पाच चमचे ताक दिवसातून दोन ते तीन वेळा दिल्यास दात येतांना होणारा त्रास कमी होतो.
आपल्याला ताक पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: अमृतसर ब्लॉग