dasana palvun lavnyasathi gharguti upay
- आरोग्य

घरात येणाऱ्या डासांना पळवून लावण्यासाठी काही घरगुती उपाय

पावसाळ्यात जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे, अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती वाढू लागली आहे. जीवघेण्या आजारांचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास डासांचे प्रमाण कमी होईल.

स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे आहे. मलेरिया,डेंग्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांना बळी पडण्यापेक्षा घरात येणाऱ्या डासांना पळवून लावण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत. पुदिनाच्या पानाचे तेल त्वचेवर लावल्याने मच्छर चावत नाही.

डासांना पळवून लावण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे घरामध्ये कडू लिंबाच्या पाल्याचा धूर करा. खोबरेल तेल व कडुलिंबाचे तेल समप्रमाणात घ्या आणि अंगाला लावा. असे केल्याने आपल्याला डास चावणार नाहीत.

लसूण हे देखील डास घालवण्याचा उपाय आहे. यासाठी लसुन किसून घ्या आणि तो पाण्यात उकळून घ्यावा आणि हे उकळलेले पाणी काही वेळासाठी रूम मध्ये ठेवा. याने डास पळुन जातील.

साधारणतः घरामध्ये डासांचे प्रमाण वाढवण्याची वेळ ही संध्याकाळची असते. तर यावेळेस तुम्ही तुमचे दार, खिडक्या काही काळासाठी बंद ठेवा. घराच्या बाहेर आजूबाजूच्या परिसरामध्ये तुळशीची झाडे लावल्याने डासांचे प्रमाण कमी होते.

मच्छरांना घरात प्रवेश करण्यासाठी तुळस प्रतिबंध करते. त्यामुळे जास्तीत जास्त तुळस लावण्याचा प्रयत्न करा. तुळस ही आरोग्यासाठी सुद्धा फार हितकारक आहे.

लवंग तेलाच्या वासाने डास दूर पळतात. तसेच निलगिरीच्या वासाने ही मच्छर राहत नाहीत. खोबरेल तेल आणि लवंगाचा तेलाचे मिश्रण एकत्र करून हे तेल अंगाला लावल्याने डास आजूबाजूला सुद्धा फिरकत नाहीत.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *