kadulimb panyat takun anghol karnyache fayde
- आरोग्य

आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची काही पान टाकून आंघोळ करण्याचे फायदे

कडुलिंबाचा उपयोग आयुर्वेदात हजारो वर्षांपासून केला जातो. आहे. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास आणि त्वचेच्या अनेक आजारावर मात करण्यास उपयोगी ठरत असतात. कडुलिंबाच्या पानांची चव कडू असते, पण हाच गुण आपल्यासाठी खूप उपयोगी असतो. आज आपण जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदात कित्येक शतकांपासून कडुलिंबाच्या पाण्याने स्नान करण्याची परंपरा चालली आहे. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर मानले जाते. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या संपूर्ण शरीरास डिटॉक्स करण्यास मदत मिळते.

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या संबंधित अनेक समस्यांपासून आपण वाचू शकता. मुरुम आणि त्वचेच्या एलर्जी दूर राहण्यास मदत मिळते. कोमट पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचेला आलेली खाज दूर होण्यास मदत होते, त्वचा निरोगी होते.

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे मुरुम, आणि काळ्या रंगाचे डाग बरे होण्यास मदत होते. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. केसांतील कोंडा आणि खरुज पासून मुक्त होण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे देखील एक चांगला उपाय आहे. हे आपले केस चमकवते.

कडुलिंबाचे पाणी तुमची थकवा दूर करण्यास मदत करते. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने डोळ्याच्या आजूबाजूला त्रासदायक असणारे बॅक्टरीया आपोआप मारले जातात.

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी दोन चमचे मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावरच्या गडद काळ्या डागांवर लावा. काही मिनिटे हा थर चेहऱ्यावर ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा. चेहरा तजेलदार होतो.

आपल्याला आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची काही पान टाकून आंघोळ करण्याचे फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडियन एक्सप्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *