kambardukhivar gharguti upay
- आरोग्य

कंबरदुखीवर प्रभावी घरगुती उपाय

बराच वेळ एकाच स्थितीत बसून किंवा उभे राहिल्यामुळे स्नायूंवर ताण येतो, त्यामुळे कंबर दुखायला सुरुवात होते. पूर्वी म्हातारपणात होणारा हा आजार आता कमी वयात होताना दिसत आहे. आज आपण जाणुन घेणार आहोत कंबरदुखी वर घरगुती उपाय.

कंबर दुखत असल्यास मोहरीच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा असे केल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळेल. उंच टाचांचे सँडल / शूज वापरल्याने कंबरेच्या स्नायूंवर ताण येतो आणि कंबर दुखु लागते. त्यामुळे प्रमानापेक्षा उंच टाचांचे सँडल / शूज वापरू नका.

नेहमीच कंबर दुखीचा त्रास होत असल्यास योगासन करा. कंबरेचे स्नायू  मजबूत होतात. योगासन करताना एक गोष्ट लक्षात असुद्या सवय नसताना वेडीवाकडी योगासने करू नका.

जाणकार प्रशिक्षकांकडूनच योगासन शिका मगच करा. कंबर दुखीचा त्रास होत असल्यास पोहणे, सायकल चालवणे, कंबरेसाठी उत्तम व्यायाम आहेत. हे सुद्धा आपण करू शकता.

कंबर दुखत असल्यास थोडेसे बर्फाचे तुकडे घ्या ते प्लास्टिकची पिशवी असल्यास त्यामध्ये ठेवा. अन ज्या ठिकाणी दुखत आहे त्या भागावर हलक्या हाताने २ मिनिटे फिरवा. थोड्या थोड्या वेळाने अस करा. यामुळे कंबर दुखीच्या वेदना कमी होतील.

प्रमानापेक्षा जास्त वजन वाढल्याने सुद्धा कंबर दुखीचा त्रास सुरु होऊ शकतो त्यामुळे वजन नियंत्रणात असुद्या. आहारात पुरेश्या प्रमाणात दूध आणि दुधाच्या पासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश असुद्या शरीरातील कैल्शियम च्या कमीमुळे सुद्धा कंबर दुखु शकते.

कंबर दुखत असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडेसे सैंधव मीठ टाकुन आंघोळ करा. सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायु मोकळे होण्यास मदत मिळते. कंबर दुखीपासून आराम मिळतो.

आपल्याला कंबरदुखीवर प्रभावी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: वेब एम डी, मेडिकल न्यूज आणि हेअल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *