dhanyat kide hou naye yasathi gharguti upay
- इन्फोमराठी

धान्यात किडे होऊ नये यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय

गृहिणींची सर्वात मोठी समस्या म्हणजे धान्यातील किडे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी या धान्यांमध्ये तसेच इतर कडधान्यांमध्ये बऱ्याच वेळा किडे होतात. अशा धान्याला  नीट करण्यात वेळ जातो आणि मोठ्या प्रमाणात धान्य हि वाया जाते.

धान्यातील हे किडे घालवण्यासाठी आपण बऱ्याच वेळा मार्केटमधील औषधांचा वापर करतो. परंतु या औषधांमुळे आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे धान्यातील किडे घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आपण करू शकतो. चला तर मग पाहूया हे उपाय.

धान्य जास्त काळ टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे ते धान्य कळक उन्हामध्ये सुकवणे. तसेच ज्या डब्यात ते भरायचे आहे तो डबा पूर्णपणे कोरडा केला पाहिजे. अन्यथा त्याला आळी लागण्याची शक्यता जास्त असते. धान्याचा डबा काही काळ उन्हामध्ये ठेऊन त्यानंतर तुम्ही धान्य भरल्यास धान्य जास्त काळ टिकते.

धान्य जास्त काळ टिकावे यासाठी डब्यामध्ये सर्वात खाली चार हळकुंड टाकून वरती धन्य टाकावे. मधल्या भागात एक हळकुंड टाकून परत त्यावर धान्य टाकावे. असे केल्यास जास्त काळ धान्य टिकते. हळद ही किडे वाढीसाठी प्रतिबंध करते. त्यामुळे धान्यांमध्ये किडे होत नाहीत.

धान्यात किडे होऊ नये यासाठी धान्य भरत असताना त्या मध्ये न्युज पेपर चे लहान लहान तुकडे करून टाका. न्युजपेपरच्या वासामुळे धान्यामध्ये किडे, जाळया होत नाही. आपल्याला धान्य लागेल त्या वेळी हे पेपर आपल्याला सहज बाजूला काढता येऊ  शकतात, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

तिसरा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे धान्यामध्ये तुम्ही लवंगा टाकू शकता. लवंगामुळे धान्यांमध्ये किडे होण्याचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे तुम्ही तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी तसेच इतर कडधान्यांमध्ये थोड्याश्या लवंगा मिसळून ठेवू शकता.

धान्यात किडे होऊ नये म्हणून यासाठी करता येईल असा सोपा उपाय कडुलिंबाची पाने. कडुलिंबाची पाने तुम्ही धान्यांमध्ये मिसळू शकता. कडुलिंबाच्या पानांनी धान्यात किडे होत नाहीत.

कडुलिंबाची पाने जंतूनाशक असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणताही धोका होत नाही. धान्य जास्त काळ टिकविण्यासाठी कडूलिंबाच्या पाल्याचा वापर पूर्वीपासून केला जातो.

आपल्याला धान्यात किडे होऊ नये यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *