chikku khanyache fayde
- आरोग्य

चिकू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

चिकू हे असे फळ आहे जे प्रत्येक हंगामात सहज उपलब्ध होते. चिकू खूप चवदार फळ आहे. चिकुमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, फॉस्फरस आणि लोह हे घटक असतात. चला तर जाणुन घेउयात चिकू खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

चिकूमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह जास्त प्रमाणात असते यामुळे चिकू हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. हाडे मजबूत बनविण्यासाठी चिकूचे सेवन तुम्ही करू शकता. चिकूमध्ये ग्लूकोज हा घटक असतो, जो शरीराला त्वरित उर्जा देण्याचे काम करतो.

दररोज व्यायाम करणार्या नी चिकू खाल्ला पाहिजे. चिकूमध्ये व्हिटॅमिन सी असते. नियमित चिकू खाल्याने रोग प्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत मिळते. रोजच तुमची जास्त चिडचिड होत असेल तर चिकू खाल्याने मन शांत ठेवण्यासाठी चिकू खा तुम्हाला फरक जाणवेल.

चिकू खाणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात व्हिटॅमिन ए आहे, जे आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगला असते. चिकू खाल्याने आपल्या म्हातारपणात डोळ्यांची समस्या तितकी जास्त प्रमाणात जाणवनार नाही.

अन्न पचनाची समस्या असल्यास चिकुचे सेवन करा त्यातील फायबर बद्धकोष्ठता दूर करते. चिकू खाल्याने त्वचेची चमक कायम राखण्यास मदत मिळेल.

चिकूमध्ये व्हिटॅमिन ई असते जे आपल्या त्वचेला ओलावा देते आणि आपली त्वचा निरोगी आणि सुंदर बनवते. म्हणून चिकू खाणे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. चिकूमध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट्स सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात.

आपल्याला चिकू खाण्याचे आरोग्यदायी फायदे  हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: नेटमेड्स आणि एन डी टी व्ही फूड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *