bhijavlele badam khanyache fayde
- आरोग्य

भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

बदामांमध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, असते. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. बदाम भिजवून खाणे फारच फायदेशीर ठरतात. बदाम भिजवल्यानंतर नरम होतात आणि पचण्यास सोईस्कर असतात.

भिजवलेले बदाम खाल्याने त्वचेवरील सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते. त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टींचा वापर करण्याऐवजी भिजवलेले बदाम खाणे श्रेयस्कर. बदाम हे  नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ आहे. सकाळी भिजवलेल्या बदामाचे सेवन केल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी भिजवलेले बदाम खाल्ल्याने शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. भिजवलेले बदाम सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावत नाही. कारण बदामामध्ये खूप अधिक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होते.

भिजवलेले बदाम खाल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत मिळते. बदामाची साल कोरडी असते. त्यामुळे ती काढून टाकण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु त्याच्यात रक्त वाढवण्याची ताकद असते. तेव्हा बदामाचे बी त्याच्या सालीसहीत खाल्ले पाहिजे.

वजन कमी करण्यासाठी आहारात भिजवलेले बदाम अवश्य सामील करा. त्यामुळे खूप वेळ भूक लागणार नाही. आणि वजन सहजपणे कमी होण्यास मदत होईल.

भिजवलेल्या बदामांमध्ये प्री बायोटेक गुण असतात. त्यामुळे प्रतिकारक्षमता मजबूत होण्यास मदत मिळते. प्री -बायोटिक गुण असल्याने आतड्यांमध्ये असणारे चांगले जीवाणू वाढतात त्यामुळे आतड्यांवर परिणाम करू शकणारा कोणताही आजार होत नाही.

भिजवलेल्या बदामाचा दुसरा फायदा म्हणजे बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते. भिजवलेल्या बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाण कमी होते.

भिजवलेल्या बदामात असलेले फॉस्फरस हाडे आणि दातांना बळकट बनवते. तसेच हाड आणि दातांशी संबंधित आजार होण्याचा धोकासुद्धा कमी होतो. दातांसाठी आवश्यक असणारे फॉस्फरस बदामातून पुरेशा प्रमाणात मिळते.

भिजवलेले बदाम सेवन केल्याने कोरडी त्वचा असणाऱ्यांच्या त्वचेत स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते. भिजवलेल्या बदामामध्ये पोटॅशिअम आणि कमी प्रमाणात सोडियम असल्यामुळे रक्तरदाबासह हृदयाशी निगडित समस्या नियंत्रणात येतात. त्यातील मॅग्नेशिअममुळे रक्त प्रवाह योग्य राहण्यास मदतगार आहे.

आपल्याला भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: एम्स इंडिया ब्लॉग आणि टाईम्स नाऊ न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *