tambya pitalechi bhandi chamkavnysathi upay
- इन्फोमराठी

तांब्या-पितळेची भांडी लख्ख चमकवण्यासाठी काही घरगुती टिप्स

तांब्या-पितळेची भांडी घासणे म्हणजे सर्वात मोठा ताप. तांब्या-पितळेच्या भांड्यावर सर्वात जास्त डाग पडतात आणि ते घासणे फार कठीण जाते. ही भांडी घासताना बऱ्याचदा आपले हात काळे होतात.

आज आपण तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती टिप्स जाणून आहोत. चला तर मग पाहूया घरगुती वस्तूंचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीने तांब्या-पितळेची भांडी लख्ख करू शकता.

तांब्याची भांडी साफ करताना तुम्ही फक्त लिंबाचा वापर सुद्धा करू शकता. अर्धा लिंबू कापून त्याने भांडी घासा. काही वेळानंतर भांड्यावरील डाग नाहीसा होईल आणि तुमची तांब्या-पितळेची भांडी लख्ख चमकू लागतील.

तांब्या-पितळेची भांडी लख्ख करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही एका वाटीमध्ये लिंबू त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा व्हिनेगर घालून हे मिश्रण एकत्र करा. भांडी साफ करायच्या काथ्यावर हे मिश्रण घेऊन त्याने तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करा. काही वेळातच भांडी लख्ख चमकायला लागतील.

पितळेची आणि तांब्याची भांडी लख्ख चमकवण्यासाठी दुसरा घरगुती उपाय म्हणजे तुम्ही डाळीचे पीठ आणि त्यामध्ये लिंबाचा रस घाला. त्यात एक चमचा मीठ घाला आणि या मिश्रणाने तांब्या-पितळेची भांडी घासा. हा उपाय केल्यास तुमची भांडी अगदी स्वच्छ दिसतील.

ज्यावेळेस घरात पितांबरी संपते. त्यावेळेस तुम्ही एका वाटीमध्ये एक चमचा लिंबाचा रस त्यामध्ये डिटर्जंट पावडर आणि एक चमचा व्हिनेगर घालून ही भांडी स्वच्छ केल्यास तांब्याच्या भांड्यांवरील डाग नाहीसे होऊन भांडी लख्ख चमकतील.

कुकरच्या आतील  डाग घालवण्यासाठी कुकरमध्ये थोडे पाणी, 1 चमचा वॉशिंग पावडर,अर्धा लिंबू घालून उकळून घ्या. नंतर घासा. डाग निघून जातील.

आपल्याला तांब्या-पितळेची भांडी लख्ख चमकवण्यासाठी काही घरगुती टिप्स हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *