tanavapasun sutaka milavnysathi gharguti upay
- आरोग्य

तणावापासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स

आजकालच्या धावपळीच्या युगात कामाची जबाबदारी, वैयक्तिक, कौटुंबिक कारणामुळे बरेच जण आपल्याला तणावात दिसतात. तणावामुळे आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतो. सध्याचे आयुष्य हे तणावाचे बनले आहे.

ताणतणाव ही आजची सर्वात मोठी समस्या बनली आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तणावापासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या टिप्स. तणावापासून मुक्त होण्यासाठी आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारा. त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करा. त्यामुळे मनावरील ताण कमी होतो.

तणावापासून सुटका मिळवायची  असल्यास आपण  रोज 10 मिनिटे योगा करायचा प्रयत्न करा. योगासने केल्यामुळे मन शांत राहते. तसेच शरीराचे आरोग्य सुधारण्यासाठी योगा फार उपयुक्त आहेत. मेंदूचे संतुलन सुरळीत चालवण्यासाठी आपण प्राणायाम करू शकता.

प्राणायामामुळे मन स्थिर होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला  लवकरच फरक दिसेल. तणावापासून सुटका मिळवण्यासाठी दीर्घ श्वास घ्या. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तणाव कमी होईल. शरीरात ऑक्सिजनचा योग्य तो पुरवठा झाल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होईल. दीर्घ श्वास घेतल्याने बऱ्याच प्रमाणात तणाव कमी होण्यास मदत होते.

मनावरील ताण कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करा. जेव्हा आपल्या शरीरावर थंड पाण्याची धार पडते तेव्हा आपल्या शरीरात तणाव कमी करणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती होऊ लागते.

कामाच्या धावपळीमुळे बऱ्याच वेळा आपल्या आवडत्या गोष्टी करणे टाळतो. तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा. जसे की खेळणे, आवडते चित्रपट पाहणे, वाचन करणे, फिरायला जाणे अशा गोष्टी केल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होईल. तसेच आपल्याला  या गोष्टींमुळे आनंद मिळेल आणि तणावापासून मुक्ती होईल.

अति ताण  घेतल्यामुळे आपल्या मेंदूवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करायची सवय स्वताला लावू शकता. दहा मिनिटे सकाळच्या शुद्ध वातावरणामध्ये चालू शकता. यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनाचा पुरवठा तुमच्या शरीराला होईल आणि दिवसभर तुमचा मूड चांगला राहील.

तणावापासून सुटका मिळवायची  असल्यास नियमित 6 ते 7 तास शांत झोप घेणे गरजेचे आहे. शांत झोप घेतल्याने आपल्या  मेंदूला आराम मिळतो आणि त्यामुळे आपल्याला ही फ्रेश वाटत.

तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे संगीत ऐकणे. संगीताचा आपल्या मनावर थेट परिणाम होतो. संगीत ही अशी गोष्ट आहे जी आपल्या मनाला प्रसन्न करते. आपल्या आवडीचे संगीत ऐकल्यामुळे मन शांत राहील आणि तणावापासून मुक्ती मिळेल.

आपल्याला तणावापासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *