potavarchi charbi kami karnyasathi gharguti upay
- आरोग्य

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

एका जागेवर बसून काम, जादा फॅट असलेला आहार यामुळे नकळत आपल्या पोटाचा घेर वाढायला लागतो. वाढलेल्या वजनामुळे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार होऊ शकतात. आपल्या आहारात थोडासा बदल करून आपण पोटाभोवती वाढलेली चरबी कमी करू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नियमित एक ग्लास गरम पाण्यात अर्धे लिंबू पिळून प्या, असे केल्याने शरीरावर चरबी जमा होणार नाही कोमट पाणी प्यायल्यामुळे मेटाबॉलिजम योग्य राखलं जातं ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी एक चमचा बडीशेप अर्धा लिटर पाण्यात टाकून उकळून घ्यायची. थंड झाल्यावर ते पाणी प्यायचे असे केल्याने आपले वजन कमी होण्यास मदत मिळेल.

आपल्या दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास टाक प्या. ताक प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळेल. आपल्या रात्रीच्या जेवणात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा. ज्वारीच्या भाकरीमध्ये चपाती पेक्षा कमी प्रमाणात फॅट असतात.

आपल्या रोजच्या आहारात साखरेचे पदार्थ असतील तर त्यांचे प्रमाण कमी करा. तसेच तळलेल्या पदार्थांच्या ऐवजी भाजलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा.

वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात कोबी, काकडी, टॉमेटो, पालेभाज्याच्या सलाडचा समावेश करा. सलाड मध्ये इतर आहाराच्या तुलनेत कॅलरीजचे प्रमाण कमी असते.

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पाणी प्यायल्याने खालेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि अतिरिक्त फॅट वाढत नाही. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्याने शरीराची पचनक्रिया शक्ती वाढते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी आपण चांगली झोप घेणे सुद्धा आवश्यक आहे. चांगली झोप घेतल्यास खालेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि अतिरिक्त फॅट वाढत नाही.

आहारासोबतच वजन आटोक्यात आणण्यासाठी शारिरीक व्यायाम गरजेचा असतो. दिवसातील काही वेळ हा शारीरिक कसरत करण्यासाठी राखून ठेवा. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण योगा करू शकता.

आपल्याला पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडिया टुडे आणि मेड लाईफ ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *