niyamit dori udya marnyache fayde
- आरोग्य

नियमितपणे दोरी उड्या मारण्याचे आरोग्यदायी फायदे

व्यायाम हा आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतो. नियमित व्यायाम केल्याने आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. बदलते हवामान, बदलते राहाणीमान, खाण्यामधील बदल यामुळे आपल्याला अनेक रोगांना सामोरे जावे लागते.

परंतु जर तुम्ही नियमित कोणतातरी एक व्यायाम केला तर तुम्ही रोगांपासून दूर राहू शकता. यासाठी सर्वात सोपा आणि घरगुती व्यायाम म्हणजे नियमित दोरी उड्या मारणे. या व्यायामामुळे आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होते. चला तर मग जाणून घेऊया नियमित दोरीच्या उड्या मारल्याने आपल्या शरीराला काय फायदे होतात.

हाडे मजबूत करण्यासाठी नियमित दोरी उड्या मारणे फायद्याचे ठरते. तुम्ही रोज 15 मिनिटे दोरीच्या उड्या मारल्या तर तुमच्या पायांची आणि हातांची हाडे मजबूत होतील.

वजन कमी करणाऱ्यांसाठी दोरी उड्या मारणे हा एक उत्तम व्यायाम आहे. रोज 15 ते 20 मिनिटे दोरी उड्या मारल्याने तुमचे वजन लवकरात लवकर कमी होईल.

हातांची पायांची तसेच सर्व स्नायूंची योग्य रीतीने हालचाल झाल्यामुळे दोरी उड्या मारणे हा सोपा आणि सर्वात उपयुक्त व्यायाम मानला जातो. त्यामुळे खांदे, पोट, पाय, हात अशा सर्व अवयवांचा योग्य पद्धतीने व्यायाम होतो.

खेळाडूंसाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे पायांची योग्य हालचाल, स्नायूंचा बळकटपणा येतो. हृदयाची क्षमता वाढते त्यामुळे उत्तम खेळाडू व्हायचे असेल तर रोज दोरी उड्या मारा.

फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी दोरी उड्या हा चांगला व्यायाम आहे. तसेच हृदयासाठी देखील हाच उत्तम व्यायाम आहे. दोरी उड्या मारल्याने शरीरावर नियंत्रण राहते.

आपल्याला नियमितपणे दोरी उड्या मारण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *