rogpratikarak shakti balkat karnyasathi gharguti upay
- आरोग्य

रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

मजबूत प्रतिकारशक्ती आपल्याला लहान आणि मोठ्या प्रत्येक आजाराविरुद्ध लढायला मदत करते. आज आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे याविषयी माहिती घेणार आहोत. 

आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढवायची असल्यास आपली पहिली पायरी आपल्या स्वयंपाकघरच्या दिशेने असावी. आपल्या स्वयंपाकघरात असे बरेच खाद्यपदार्थ आहेत जे आपली प्रतिकारशक्ती मजबूत बनवू शकतात. या गोष्टी तुम्हाला आपल्या घरात सहज सापडतील तर आपण कशाची वाट पाहत आहात, या गोष्टी खा आणि तुमची प्रतिकारशक्ती बळकट करा.

व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशी वाढविण्यास मदत करते, आपले शरीर व्हिटॅमिन सी बनवत नाही किंवा ते साठवत नाही. म्हणून आपण आपल्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन सी चा समावेश करणे गरजेचे आहे.

लिंबूवर्गीय फळांमध्ये  व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. आपल्याला घरात ही फळे सहज पणे उपलब्ध ही असतात. लिंबू, मोसंबी, संत्रे, आवळा, द्राक्ष, यापैकी जे फळ उपलब्ध असेल ते आपण खाऊ शकता.

आहारात पालकचा समावेश करा पालकमध्ये व्हिटॅमिन सी बरोबरच अँटी-ऑक्सिडेंट आणि बीटा-कॅरोटीन असते. पालकची भाजी खाल्याने प्रतिकारशक्ती बळकट होण्यास मदत मिळेल.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पपईचा समावेश करा. पपईमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी सोबत त्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात. पपई खाल्याने प्रतिकारशक्ती बळकट होण्यास मदत मिळेल.

आहारात आल्याचा वापर केल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळू शकते. प्रतिकारशक्ती वाढविण्याव्यतिरिक्त, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही आले प्रभावी ठरू शकते.

जिंझरोल फक्त आल्यामध्ये आढळते. जे असिडिटी कमी करण्यास उपयुक्त आहे. आपल्या रोजच्या आहारात लसणाचा वापर करा. लसून केवळ आपल्या जेवणाची चवच वाढवत नाही तर आपली प्रतिकारशक्ती देखील वाढवतो.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात दहयाचा समावेश करा. दही व्हिटॅमिन डी एक उत्कृष्ट स्रोत आहे आहे. व्हिटॅमिन डी तुमची प्रतिकारशक्ती नियंत्रित करण्यात मदत करते. आणि रोगापासून आपल्या शरीराच्या संरक्षणाला प्रोत्साहन देते.

बदामाचे सेवन केल्याने केवळ तुमची स्मरणशक्तीच मजबूत होत नाही तर तुमची प्रतिकारशक्ती देखील बळकट होते. व्हिटॅमिन ई निरोगी रोगप्रतिकारक शक्तीची गुरुकिल्ली आहे. आणि बदामांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते.

आपल्याला रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन आणि एव्हरी डे हेअल्थ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *