asidity zalayavar gharguti upay
- आरोग्य

एसिडीटी झाल्यास करा हे घरगुती उपाय

छातीत जळजळ, आंबट ढेकर येण, उलटीसारख वाटण ही सगळी एसिडीटी झाल्याची लक्षण आहेत. उलट सुलट खाण्याच्या सवयी, अपुरी झोप, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा कारणांनी शरीरात आम्लपित्त (एसिडीटी) निर्माण होत. चला तर जाणुन घेउयात एसिडीटी झाल्यास कोणते उपाय करता येतील.

एसिडीटी झाल्यास आल्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि एक ग्लास पाण्यात गरम करुण ते गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या आराम मिळेल. पोटात जळजळ होत असल्यास कोरफडाचा रस ज्यूस प्या. तुम्हाला फरक जाणवेल.

एसिडीटी झाल्यास गुलूकंदाचे सेवन करा. घशातील आंबटपणा कमी होईल. रात्री झोपण्यापूर्वी दहा ग्रॅम मनुका भिजवायला ठेवा अन सकाळी ते खा असे केल्याने आम्लपित्तापासून मुक्तता होईल.

जेव्हा आपल्याला पोटात जळजळ होते तेव्हा तीन ते चार बदाम खा. बदाम आम्ल नियंत्रित करण्यासाठी कार्य करते. जेवना नंतर एक ग्लास पुदीन्याचे पाणी प्या. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पचनक्रिया सुधारून पोटदुखी व जळजळ थांबण्यास मदत होईल. आणि पोटातील आंबटपणापासून आराम मिळेल.

जेवना नंतर एक चमचाभर बडीशेप खा. बडीशेप खाल्याने पचनक्रिया सुधारून पोटदुखी व जळजळ थांबण्यास मदत होईल. खरबूज, टरबूज, आणि चिकू केळी यांचे सेवन केल्याने पोटाची जळजळही कमी होते.

एसिडीटी झाल्यास रिकाम्या पोटी नारळ पाण्याचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे. एसिडीटी झाल्यानंतर आवळा सुपारी किंवा आवळ्याची एखादी फोड जरी तोंडात ठेवली तरी आराम मिळू शकतो.

आवळ्याचा रस एसिडीटी कमी करतो. थंड गोष्टींचे सेवन केल्याने पोटाची जळजळ होण्याची समस्या कमी होते. म्हणून लस्सी आणि दही खा आणि शक्य असल्यास आपण हे दररोज करू शकता.

जेव्हा आपल्याला पोटात जळजळ होते तेव्हा गुळाचा एक छोटा तुकडा खा. त्यात मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आतड्यांची ताकद वाढण्यास मदत होते.  ज्यामुळे आम्लता कमी होते तसेच पचन देखील टिकते. दररोज जेवण केल्यानंतर गुळाचा एक छोटा तुकडा खा.

आपल्याला एसिडीटी झाल्यास करा हे  घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फार्मइजी ब्लॉग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *