karvand khanyache fayde
- आरोग्य

डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंद खाण्याचे फायदे १० फायदे

डोंगरची काळी मैना म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. एप्रिल-मे महिन्यात करवंदाला फळे येतात. फळे हिरवी, लंबगोल, मृदू व गोटीसारखी असून पिकल्यावर जांभळट काळी होतात.

ही फळे चवीला आंबट-गोड असतात. फळात बहुधा चार बिया असतात. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. करवंद हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा आज जाणून घेऊयात करवंद खाण्याचे फायदे. करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

 करवंद हा रानमेवा आहे, तो नैसर्गिकरीत्या उपलब्ध झालेला असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच, शिवाय आरोग्यासही हितावह आहे. सहसा मोठय़ा शहरांमध्ये हा रानमेवा मिळत नसल्यामुळे बरेच जण याच्या स्वादापासून व यातून मिळणाऱ्या पौष्टिक घटकांपासून वंचित राहतात.

करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असल्याने हाडांसाठी देखील करवंद उत्तम आहेत. करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो. तसेच ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

करवंदामध्ये मोठय़ा प्रमाणात सायट्रिक एसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात. सूर्याच्या प्रखर उष्णतेने जर शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे. करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तसेच आंबट ढेकर येत असतील तर अशा अवस्थेत करवंदाचे सरबत थोडय़ा-थोडय़ा अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.

करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.

रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल. करवंदाच्या रसामध्ये मधुरता आणि आम्लता असल्यामुळे अपचन झाले असेल, तर अन्नाचे पचन होण्यासाठी करवंदाचे सरबत थोडय़ा थोडय़ा अंतराने पीत राहावे.

करवंदे वातशामक असल्यामुळे पोटात गुबारा धरला असेल तर करवंद सेवनाने पोट व आतडय़ांचे आरोग्य चांगले राहून वायूचे मलावाटे निस्सरण होते. करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.

उष्णतेमुळे शरीराची काहिली होते तेव्हा करवंदाचे सरबत प्यायल्याने अधिक आराम मिळतो. करवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये करवंद सेवनाचा लाभ होतो. वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.

उलटी, मळमळ, अरुची ही भावना कमी होण्यासाठी व विपुल प्रमाणात कॅल्शिअम मिळण्यासाठी करवंदे खावीत. ही फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावीत. हा रानमेवा अवश्य खावा असा आहे.

आपल्याला करवंद खाण्याचे फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: नेटमेड ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *