chehryavaril kalepana dur karnyasathi gharguti upay
- आरोग्य

चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

उन्हात बाहेर पडल्यामुळे, प्रदूषित वातावरणामुळे बऱ्याच वेळा आपला चेहरा काळा पडतो. चेहऱ्यासोबतच आपले हात ही काळे होतात. हा काळपटपणा आपले सौंदर्य कमी करतो. चेहऱ्यावर काळपटपणा आल्यामुळे नैसर्गिक चमक निघून जाते. अशावेळी घरगुती उपाय करून हा काळपटपणा आपण घालू शकतो.

त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील आणि हातावरील काळपटपणा दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत हे उपाय.

चेहऱ्यावरील त्वचा अतिशय संवेदनशील असते त्यामुळे ही त्वचा सूर्याच्या किरणांपासून वाचवणं अतिशय गरजेचं असत. त्यामुळे घरून निघण्यापूर्वी नेहमी आपल्या चेहऱ्याच्या  त्वचेला सनस्क्रिन लावायला विसरू नका.

चेहऱ्यावरील आणि हातावरील काळपटपणा दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे मिल्की स्क्रब यासाठी दोन चमचे साखर दोन चमचे दुधाच्या मलईमध्ये मिसळा. त्यात थोडेसे ऑलिव ऑइल घाला.

हे मिश्रण एकत्र करून पेस्ट तयार करा आणि हलक्या हातांनी आपल्या चेहऱ्यावर मसाज करा. 5 / 10 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची नैसर्गिक चमक येईल.

चेहऱ्यावरील काळेपणा घालवण्यासाठी संत्र्याची  साली वाळवून त्याची पावडर करुन ठेवा. या पावडरमध्ये दही घालून या मिश्रणाने आपल्या चेहऱ्यावर 2 / 3 मिनिटे मसाज करा. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.  असे केल्याने  आपल्या चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते.

मध आणि साखर यांचे एकत्रित मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावल्याने काळपटपणा लवकर जातो. मधामध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात जे मॉइस्चरायझर सारखे काम करतात.

तसेच त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढण्यासाठी मध आणि साखर यांचे मिश्रण फार उपयुक्त आहे. या स्कबने चेहऱ्यावरील काळपटपणा तसेच विषारी घटक बाहेर निघून त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते.

आपला चेहरा काळवंडला असल्यास आपण त्यावर कोरफड जेल लावल्यास त्याचा त्वचा उजळण्यास निश्चितच फायदा होतो. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी साखर आणि लिंबू रसाने स्क्रब करा.

काळवंडलेल्या चेहऱ्यावर आणि हातावर आपण याचा उपयोग करू शकता यासाठी दोन चमचे साखर चार चमचे लिंबाचा रस एका वाटीमध्ये एकत्र करा आणि हलक्या हातांनी स्क्रब करा.

चेहऱ्यासोबतच मानेवर, हातावर हा स्क्रब लावा. साखरेचे दाणे विरघळेपर्यंत तुम्ही हा मसाज करु शकता. हा प्रयोग केल्यामूळे चेहऱ्यावरील टॅनिंग आणि काळे डाग कमी होतील. तुमचा चेहरा लख्ख उठून दिसेल.

आपल्याला चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फार्मइजी ब्लॉग आणि स्टाईलक्रेझ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *