nakh vadhavnyasathi gharguti upay
- आरोग्य

नखं वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

मुलींना सुंदर, लांब नखे आवडतात. परंतु काही मुलींची नखे इतके नाजूक असतात की ती थोडी वाढल्यानंतर लगेच तुटतात. नख नाजूक असणे ही बऱ्याच मुलींची समस्या असते. अनेक महिला नखांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात.

नखे तुटण्याची अनेक कारणे असू शकतात. नखांची वाढ सुधारण्यासाठी, नखे मजबूत करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते आज आपण पाहूयात.

आहारात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता असल्यास नखे तुटतात. तसेच आयर्न, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी हे नखे मजबूत करण्यासाठी फार उपयुक्त घटक आहेत. त्यामुळे नखे मजबूत करण्यासाठी हे पोषक घटक असलेला आहार घ्या.

नखांची वाढ सुधारण्यासाठी संत्राचा रस आणि नारळाचा रस नखांवर दहा मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने हात धुवा. काही दिवस असे केल्याने लवकरच आपली नखे वाढतील. नखे मजबुत करण्यासाठी संत्राचा आणि नारळाचा रस मदत करतो.

नखे मजबूत करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलने नखांची मालिश करा. या तेलाने लवकर नखे वाढतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते जे नखांना पोषण पुरवते आणि नखांमध्ये रक्त प्रवाह वाढवते. त्यामुळे नखांना मजबूती मिळेल.

लसूण नखे वाढविण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. लसणाचे दोन तुकडे करा आणि आपल्या नखांवर 10 मिनिटे लावा. असे केल्याने काही दिवसांत तुमची नखे चांगली वाढतील आणि नखांना मजबूती येईल.

खोबऱ्याच्या तेलाने किंवा ऑलिव्ह ऑइलने नखांची मसाज केल्यास नखे मजबूत होतात. तुम्ही आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करा. तुमची नखे लवकरच मजबूत होतील. तुमच्या नखांना वेगळी चमक ही येईल.

आपल्या आहारात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा. यामुळे हाडे आणि नखे मजबूत होतात. तुम्ही जर नियमित दुधाचे सेवन केले तर तुमचे नखे मजबूत आणि सुंदर होतील.

आपल्याला नखं वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन आणि स्टाईलक्रेझ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *