lahanmulanchi smaranshakti vadhvanyasathi gharguti upay
- आरोग्य

लहानमुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

लहान मुलांच्या वाढत्या वयासोबत त्यांची स्मरणशक्ती वाढणे देखील महत्त्वाचे असते. विशेषतः घरातील स्त्रिया या लहान मुलांच्या आहाराकडे आवर्जून लक्ष देत असतात. वाढत्या वयाबरोबर त्यांचे खाणे-पिणे योग्य पद्धतीने असावे यासाठी अनेक उपाय देखील करत असतात.

आजकालच्या धावपळीच्या जगात नोकरी सांभाळत आई-वडिलांना मुलांकडे लक्ष देणे तितकेसे जमत नाही. अशा वेळेस मुलांची स्मरणशक्तीची वाढ व्हावी यासाठी पुढील घरगुती उपाय नक्की करा.

लहान मुले सहसा दूध पिण्यास नकार देतात. परंतु दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रथिने असतात. त्यामुळे लहान मुलांना दूध देणे अतिशय आवश्यक आहे. दुधामध्ये थोडीशी साखर टाकून अथवा हळद टाकून दिल्यास शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती देखील वाढते.

रोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने देखील स्मरणशक्ती चांगली राहते. यासाठी लहान मुलांना भिजवलेले बदाम खायला द्या. त्यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास जलद गतीने होतो.

असे म्हटले जाते एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा. हो हे खरं आहे! त्यामुळे लहान मुलांना रोज एक सफरचंद ते पण सालासहित खायला द्या. सालीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात. त्यामुळे मुलांच्या शरीराची वाढ होते. त्याचबरोबर मुलांच्या मेंदूचा विकास देखील लवकर होतो.

अक्रोडमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉंस्फरस, हे घटक मुबलक प्रमाणात असतात. अक्रोड हे बुद्धिवर्धक  असते. मुलांच्या नाश्त्यामध्ये ह्या सुपरफूडचा समावेश अवश्य करा.

लाल बीट हेदेखील स्मरणशक्ती वाढवण्याचा रामबाण आहे. बीटामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन बी1, बी2 आणि सी तसेच आयरन असते. हे पोषक घटक लहान मुलांचा वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. त्यामुळे लहान मुलांना बीट खायला देणे अतिशय फायदेशीर आहे.

लहान मुले पालेभाज्या खात नाहीत. परंतु पालेभाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला फार फायदेशीर असतात. त्यामुळे लहान मुलांना नियमित पालेभाजी दिल्यास देखील स्मरणशक्ती मध्ये वाढ होते. यामध्ये पालक, मेथी अशा भाज्यांचा समावेश करावा.

लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यामध्ये उकडलेली अंडी खायला देऊ शकता. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. जे चयापचय वाढवण्यास मदत करतात.

उकडलेल्या अंड्याच्या पांढऱ्या भागात अधिक प्रथिने असतात. अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी, बी 12 आणि बी 6, तांबे, लोह आणि जस्त हे घटक हि असतात. अंडी खाल्याने मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत मिळते.

आपल्याला लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी.

हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. सदर माहिती कोणत्या संकेतस्थळाच्या आधारे संकलित करण्यात आली आहे याचा संदर्भ खाली दिलेला आहे. संदर्भ: १) मेडलाईफ ब्लॉग, २) इंडियन एक्सप्रेस, ३) फर्स्ट क्राय आणि ४) वेब एम डी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *