kapalavaril kalvatpana ghalavnyasathi gharguti upay
- आरोग्य

कपाळावरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या आजूबाजूला असलेल्या धूळ आणि प्रदूषणानामुळे आपल्या त्वचेचा रंग काळपट दिसू लागतो. वेगवेगळ्या केमिकलचा वापर करून बनवलेल्या प्रसाधानाचा वापर केल्याने आपल्या त्वचेला नुकसान पोहचू शकते.

म्हणूनच आज आपण कपाळावरील त्वचेचा रंग उजळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. कपाळावर डाग आणि सुरकुत्या असल्यास नारळाचे पाणी दिवसातून 2 वेळा कपाळावर लावल्याने कपाळावरील डाग आणि सुरकुत्या कमी होतील.

कपाळावरील काळपटपणा घालवण्यासाठी कच्चा बटाटा खूप प्रभावी आहे. कच्चा बटाटा कपाळावर चोळल्याने कपाळाचा काळपट कमी होतो. तसेच डोकेदुखी देखील दूर होते. जर तुमच्या कपाळाच्या काळेपणामुळेही तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही कपाळावर बटाटा कापून हलक्या हाताने घासू शकता.

मध आणि साखर यांचे एकत्रित मिश्रण आपल्या कपाळावर लावल्याने काळपटपणा लवकर जातो. त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढण्यासाठी मध आणि साखर यांचे मिश्रण फार उपयुक्त आहे.

कपाळावरील काळपटपणा घालवण्यासाठी एक पिकलेले टॉमेटो कापून घ्या. हलक्या हाताने ते आपल्या कपाळावर रगडा 10 मिनिटे टॉमेटोचा रस आपल्या कपाळावर राहूद्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. आपल्याला फरक दिसेल.

दूध आणि गुलाबाचे पाणी वापरुन कपाळाचा काळपट दूर होतो. दूध आणि गुलाब पाणी एकत्र मिसळा आणि रात्री झोपेच्या आधी कपाळावर लावा. रात्रभर कपाळावर राहूद्या. असे केल्याने कपाळाचा काळपट दूर होईल.

काकडीचा रस कपाळाचा काळपट दूर करण्यास मदत करतो. दररोज कपाळावर काकडीचा रस लावल्याने कपाळाचा काळपट दूर होतो.

कपाळावरील काळपटपणा घालवण्यासाठी 50 ग्राम मसूर डाळ रात्री भिजायला ठेवा. सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता हि पेस्ट आपल्या कपाळावर लावा. 20 मिनिटे राहूद्या नंतर थंड पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने कपाळाचा काळपट दूर होईल.

कपाळावरील काळपटपणा घालवण्यासाठी दोन ते तीन चमचे साखर घ्या. त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून हलक्या हाताने आपल्या कपाळावर मालिश करा. असे केल्याने चेहऱ्यावर  साचलेली घाण निघून जाईल. काही वेळात आपला चेहरा स्वच्छ धुवा. तुम्हाला फरक जाणवेल.

कपाळाचा काळपट बदामाच्या तेलाने दूर करता येतो. यासाठी आपण काही चमचे बदाम तेल घ्या, त्यात मध आणि दुधाची भुकटी मिसळा. आता हे मिश्रण कपाळावर लावा. जेव्हा हे मिश्रण कोरडे होईल तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवा. कपाळाचा काळेपणा दूर करण्यासाठी हे मिश्रण दररोज लावा.

आपल्याला कपाळावरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. सदर माहिती कोणत्या संकेतस्थळाच्या आधारे संकलित करण्यात आली आहे याचा संदर्भ दिला आहे. संदर्भ: हेअल्थलाईन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *