badam dudh pinyache fayde
- आरोग्य

बदाम आणि दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे

सध्या प्रत्येक माणूस आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक होत आहे. आहार आणि आरोग्याचा थेट संबंध असल्याने लोक त्यांच्या आहारात अनेक गोष्टींचा समावेश करतात. बदामांचे दूध पिणे जितके अधिक चवदार आहे तितके आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आज आपण बदामाच्या दुधाचे आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांविषयी जाणून घेऊयात.

बदाम आणि दुधातून कॅल्शियम मिळते. जे तुमच्या हाडांसाठी एक वरदान आहे. दुधात व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असते. बदाम दुधामुळे संधिवात, हाडांचे रोग आणि दातांच्या रोगांपासून संरक्षण होते.

बदामाचे दूध आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि रोगांविरूद्ध लढण्यासाठी ताकद देते. बदामाच्या दुधात व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन-ई असते. हि दोन जीवनसत्त्वे प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.

बदामाचे दूध पिणे डोळ्यांसाठी चांगले आहे. त्यात व्हिटॅमिन ई आणि असे काही अँटीऑक्सिडेंट्स आढळतात जे डोळ्यांवरील ताण आणि डोळ्याच्या आजारांसारख्या जसे की मोतीबिंदू इ. विरूद्ध लढायला मदत करतात.

खाद्यपदार्थांमध्ये असलेली साखर मधुमेहाची समस्या आणखी वाढवू शकते. अशावेळी बदामाच्या दुधाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. त्यात साखर आणि कर्बोदकांचे अल्प प्रमाणात असते. तसेच त्यात आढळणारा फायबर रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कार्य करतो.

बदाम दुध प्यायल्याने हाडांचा चांगल्या प्रकारे विकास होण्यास मदत मिळते. तसेच स्मरणशक्ती सुधारण्यास मदत मिळते. वाढत्या वयात मुलांना बदाम दुध प्यायला दिल्याने त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत मिळते.

बदामाचे दूध त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्यात आढळणारे पोषक घटक आपल्याला त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करतात. विशेषतः व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई चे प्रमाण त्यात चांगले आढळते.  व्हिटॅमिन-डी त्वचेला हानिकारक बॅक्टेरियांपासून संरक्षण देते. त्यामुळे बदामाचे दूध पिणे त्वचेसाठी फायद्याचे आहे.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे बऱ्याच लोकांची हाडे कमकुवत होतात. विशेषतः वयानुसार हाडांना अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. रात्री झोपण्याआधी एक ग्लास बदाम दुध प्यायल्याने काही दिवसात सांधेदुखीचा त्रास होणे थांबू शकते.

आपल्याला बदाम आणि दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन ब्लॉग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *