tacha dukhivar gharguti upay
- आरोग्य

टाचा दुखीवर करा हे घरगुती उपाय

शरीरावर अनेक लहान-मोठ्या वेदना होत असतात ज्याकडे बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो परंतु, वेळेवर काळजी घेतल्यास आपण या गोष्टी टाळू शकतो. खूप वेळ उभे राहील्याने, चूकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखी लागतात. आपल्या संपूर्ण शरीराचा भार टाचांवर पडतो आणि टाचा दुखू लागतात.  म्हणूनच आज जाणून घेऊयात टाचा दुखीवर काही घरगुती उपाय.

टाचांचे दुखणे कमी करण्यासाठी मोहरीच्या तेलाने आपल्या तळव्यांना मालिश करा. मालिश केल्याने लगेचच आराम मिळतो. मालिश  केल्याने शीरा मोकळ्या होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. टाचांचे दुखणे कमी होण्यास मदत मिळते.

सतत टाच दुखीचा त्रास उद्भवत असल्यास  चालणे कमी करावे सोबतच घरात असतांना मऊ चप्पलचा प्रयोग करावा आणि शक्य झालं तर गवताळ भागात अर्थातच जेथे गवत आहे तेथे काही वेळ चालावे. असं केल्याने देखील त्रास कमी होईल.

टाचा दुखत असल्यास एका बादलीत कोमट पाणी घ्या त्यामध्ये मुठभर खडे मीठ टाका. आणि साधारण अर्धा तास त्या पाण्यामध्ये पाय टाकून बसा. असं नियमितपणे केल्यास टाच दुखी कमी होईल.

टाचदुखीवर पायांचा व्यायाम फायदेशीर ठरेल. भिंतीला टेकून पायाच्या बोटांवर उभं राहावे जेणेकरून टाचा वर-खाली करता येईल. असं केल्यानंतरही आपणास फरक जाणवेल.

टाच दुखत असल्यास आपल्या टाचा बर्फाने शेकवा. बर्फाने टाचा शेकावल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळेल. सोबतच, नियमितपणे उकळून गार केलेले पाणी आणि झोपतांना दूध प्यावे.

याव्यतिरिक्त, दह्यात काळी मिरी किंवा ताक असल्यास त्यात आले घालून दिवसातून २ वेळा  त्याचे सेवन करावे. टाचा दुखत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोरफड गराचा लेप टाचांना लावा. जे टाचा दुखीचा त्रास कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

टाचा दुखत असल्यास आहारात त्वरित कोबी, भेंडी, पडवळ, सुरण, तोंडली  इत्यादी फळभाज्यांचे आणि बोरं, पेरू, डाळिंब, खजूर सारख्या फळांचा समावेश करा. ह्या मध्ये विटामिन डी चांगल्या प्रमाणात असत. म्हणून यांचे सेवन केल्याने हाडांना बळकट पणा यायला मदत मिळते.

आपल्याला टाचा दुखीवर करा हे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन आणि मेडलाईफ ब्लॉग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *