kesa galat aslyas gharguti upay
- आरोग्य

केस गळत असल्यास करा हे सोपे घरगुती उपाय

बऱ्याचदा आपले केस चमकदार, लांब दिसावेत यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची प्रसाधने वापरत असतो. परंतु अशा प्रसाधनांच्या वापराने आपले केस गळायला लागतात.

या बरोबरच धूळ, प्रदूषण, दुषित पाण्याने केस धुणे यामुळे आपले केस गळायला लागतात. आज आपण केसांची निगा राखण्यासाठी घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत. ज्यांच्या मदतीने आपले केस गळणे सहज टाळता येऊ शकते.

केस गळत असल्यास एका कप पाण्यात 2 चमचे मेथीचे दाणे बारीक करून घ्या. हे मिश्रण आपल्या केसांच्या मुळांवर लावा आणि अर्धा तास तसेच राहूद्या मग साध्या पाण्याने केस धुवा.

महिन्याभर असे केल्याने आपल्याला त्याचा परिणाम दिसेल. केस गळणे थांबवण्यासाठी मेथीच्या दाण्यांना रात्री पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यावी. नंतर ती पेस्ट केसांवर लावा. काही दिवस असे केल्याने, केस गळती थांबते.

केस गळणे थांबवण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा साधारण गरम नारळाच्या तेलाने मालिश करा गरम तेलाने मालिश केल्याने केस केवळ मऊ राहत नाहीत तर नारळाच्या तेलामधील पोषकतत्व केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात.

डोक्यात बोटांनी हालचाल केल्यामुळे डोक्यात रक्ताचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे केसांच्या मुळांची ताकद वाढण्यास मदत मिळते. केस गळणे थांबवण्यासाठी केसांना अंड्याचा बलक हि लावू शकता.

अंड्याचा बलक लावल्याने केस चमकदार तर होतील त्या बरोबर केस गळणे हि कमी होईल. अंड्यांमध्ये बायोटिन नावाचे व्हिटॅमिन असते. जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करते.

केस गळणे थांबवण्यासाठी कोरफडाचा गर फार उपयोगी आहे. यासाठी कोरफडाचा गर आपल्या केसांच्या मुळांवर आणि अर्धा तास राहूद्या. नंतर साध्या पाण्याने धुऊन टाका. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा.

केस गळत असल्यास दोन चमचे दहयामध्ये एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिक्स करून डाई करायच्या ब्रशच्या सहाय्याने ही पेस्ट अर्ध्या तासासाठी केसांच्या मुळांवर लावा. मग साध्या पाण्याने धुवा आठवड्यातून एकदा असे केल्याने लवकर फरक दिसेल.

केस गळणे थांबवण्यासाठी कांदा मिक्सर मध्ये बारीक करून घ्या कांद्याचा रस स्वच्छ कपड्याने गाळून घ्या. हा रस केसांच्या मुळावर लावा आणि अर्धा तास राहूद्या. नंतर साध्या पाण्याने धुऊन टाका. कांद्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म रक्त परिसंचरण वाढवतात. आठवड्यातून एकदा असे केल्याने फरक दिसू लागेल.

केस गळणे थांबवण्यासाठी प्रथिनेयुक्त गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करा. सोयाबीन, शेंगदाणे, दुध, अंडी यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असते. केसांच्या शाफ्टमध्ये एक चतुर्थांश पाणी असते म्हणून निरोगी केसांच्या वाढीसाठी किमान चार ते आठ ग्लास पाणी प्या.

आपल्याला केस गळत असल्यास करा हे सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन आणि टाईम्स ऑफ इंडिया ब्लॉग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *