ashaktpana dur karnysathi gharguti upay
- आरोग्य

अशक्तपणा दूर करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला पोषक आणि संतुलित आहार घेण शक्य होत नाही. यामुळेच आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषकतत्व मिळत नाही. परिणाम स्वरूप आपले वजन कमी होऊ लागते.

अशक्तपणा असल्यास कोणताही आजार आपल्याला लवकर होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आपण जाणून घेऊयात अशक्तपणा दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय.

वजन वाढण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट शक्य तितके ताणमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. वजन वाढण्यासाठी ताणमुक्त राहणे गरजेचे आहे. वजन वाढवण्यासाठी काळे मनुके रात्री दुधात भिजवून रोज सकाळी खावा. मनुके फॅट्सला हेल्दी कॅलरीजमध्ये बदलण्याचे काम करतात.

वजन वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्याचा आपल्या आहारात समावेश करा. आयुर्वेदामध्ये पालक हे रक्तवर्धक म्हणून सांगण्यात आलेले आहे. पालकमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर भिजायला टाका. झोपण्याआधी दुध पिऊन खजूर खाऊन टाका. खजुराच्या सेवनाने  लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते, परिणामी वजन वाढण्यास मदत मिळते.

वजन वाढवण्यासाठी गुळ आणि शेंगदाणे खा. शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत शरीराला उर्जा आणि स्फूर्ती मिळते. वजन वाढवण्यासाठी आपल्या आहारात डाळी, मासे, अंडी, चिकन यांचा समावेश करा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

वजन वाढवण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम दिसतो. जेवणापूर्वी पाणी पिऊ नका. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरु शकते. आणि आपल्याला जेवण जाणार नाही. 

वजन वाढवण्यासाठी आपण थोडासा व्यायाम, योगा करायची सवय लावली पाहिजे. व्यायाम केल्याने आपण जे काही खातो त्याचे पचन व्यवस्थित होऊन अशक्तपणा दूर होतो.

आपल्याला अशक्तपणा दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फूड एन. डी. टी. व्ही. आणि स्टाईल क्रेझ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *