othancha kalepana gharguti upay
- आरोग्य

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

सूर्यप्रकाशात जास्त वेळ काम केल्याने, कमी दर्जाच्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर केल्याने, जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने, जास्त वेळ ओठांवर लिपस्टिक लावून ठेवल्याने ओठांवरचा नैसर्गिक गुलाबी रंग निघून जातो. आणि आपले ओठ काळे दिसू लागतात या काही घरगुती उपायांची मदत घेऊन आपण आपले ओठ पूर्वी सारखे गुलाबी करू शकता.

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक लिंबू कापून घ्या. हलक्या हाताने ते आपल्या ओठावर घासा. रात्रभर तसेच राहूद्या सकाळी झोपेतून उठल्यावर आपला चेहरा धुऊन टाका. नियमित काही दिवस असे केल्याने आपल्या ओठावरील डेड स्कीन निघून जाईल आणि आपले ओठ पूर्वी सारखे गुलाबी दिसू लागतील.

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये ग्लिसरीन, मध आणि लिंबाचा रस समान प्रमाणात घ्या. रात्री झोपायच्या आधी या मिश्रणाने ओठांची मालिश करा. रात्रभर तसेच राहूद्या सकाळी झोपेतून उठल्यावर धुऊन टाका. चांगल्या परिणामासाठी काही दिवस हा उपाय नियमित करा.

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी रात्री झोपण्याच्या आधी एक लिंबू कापून घ्या. त्यावर थोडीशी साखर लावा. आणि हलक्या हातानी आपल्या ओठावर रगडा सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने ओठ धुऊन टाका.

असे केल्याने आपले ओठ परत पूर्वीसारखे व्हायला मदत मिळेल. चांगल्या परिणामासाठी हा उपाय आपण आठवड्यातून दोन वेळा करू शकता.

आपले ओठ कोरडे आणि काळे दिसत असतील तर पुढील उपाय आपण त्यावर करू शकता. यासाठी काकडीच्या स्लाईस करून घ्या. त्याने आपल्या ओठावर 5 ते 7 मिनिटे घासा.

काकडीचा वापर केल्याने आपल्या ओठांचा रंग हलका होण्यास मदत मिळते. याचा रोज वापर केल्याने आपल्या ओठांची कोरडेपणा हि कमी होईल.

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. झोपण्याआधी तुमच्या ओठांना बीटाचा रस लावा. आणि रात्रभर ओठांवर हा रस तसाच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर ओठ पाण्याने धुऊन टाका. असे केल्यानेआपल्या ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग आलेला दिसून येईल.

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी 1 स्ट्रॉबेरी हाताने बारीक करून पेस्ट बनवून एका वाटीमध्ये घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा त्यानंतर हे मिश्रण रात्री झोपण्याआधी आपल्या ओठावर लावा. सकाळी थंड पाण्याने आपले ओठ धुऊन घ्या. हा उपाय एकदा केल्याने हि आपल्याला फरक दिसेल.

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी रात्री झोपण्याच्या आधी मधाच्या काही थेंबानी 1-2 मिनिटांसाठी ओठांवर मसाज करा. रात्रभर राहू द्या, सकाळी पाण्याने स्वच्छ करा. असे नियमित केल्याने आपले ओठ मऊ होतील. याबरोबरच ओठांचा काळेपणा हि कमी होईल.

आपल्याला ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *