mosambi khanyache fayde
- आरोग्य

मोसंबी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

फळे खाणे शरीरासाठी चांगले असते. मोसंबी खाणे  शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. याला “गोड लिंबू” असेही म्हणतात.

गुणकारी असणाऱ्या मोसंबी या फळांमध्ये ए, बी, सी ही जीवनसत्त्वे असून यामध्ये शर्करा आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक आहे. याची चव आंबट-गोड आहे. शरीराच्या अनेक समस्येवर मोसंबी खाणे फायद्याचे आहे.

मोसंबी खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी मोसंबीचे सेवन केले जाते. पोटासंबंधित समस्यावर मोसंबीचा ज्युस पिणे फायदेशीर आहे. मोसंबीच्या ज्युसमध्ये मीठ टाकून पिल्यास पोटात संबंधित अनेक समस्या दूर होतात.

मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याचा फायदा त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी होतो. मोसंबीचे नियमित सेवन केल्यास त्वचा, केस आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. नियमित मोसंबी खाल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते.

नियमित मोसंबीचे सेवन केल्याने मोसंबीमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पचनशक्ती सुधारायला मदत मिळते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास आपण नियमित मोसंबीचा रस प्या अथवा मोसंबीचा आपल्या आहारात समावेश करा.

मोसंबीचा रस प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहायला मदत मिळते तसेच हात पायांना मुंग्या येत नाही. कोमट पाण्यामध्ये मोसंबीचा रस आणि मध एकत्र करून पिल्यास वजन कमी होते.

वजन वाढत असेल तर दिवसातून एकदा मोसंबीचा ज्युस पिल्यास वजन नियंत्रित राहते. तसेच यात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने चक्कर येणे, उलट्या होणे यांसारखे त्रास जाणवू लागतात. अश्यावेळी आपण मोसंबी खाऊ शकता किंवा मोसंबीचा रस पिऊ शकता.

हिरड्यातून रक्त येण्याची समस्या असेल तर मोसंबी खाल्ल्यास हिरड्यातून रक्त येण्याची समस्या दूर होते. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे हिरड्यातून रक्त येते. मोसंबी मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे या समस्येवर फायदा होतो.

नियमित मोसंबीचे सेवन केल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालण्यास मदत मिळते. ज्यामुळे हृदयाचे कार्य व्यवस्थित होते. नियमित मोसंबीचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत मिळते.

रोज मोसंबीचा रस पिल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्तदाबाची समस्या दूर होते. मोसंबीचा रस ओठांना लावल्यास ओठ फुटण्याची समस्या दूर होईल. गॅसची समस्या सोडवण्यासाठी मोसंबीच्या रसामध्ये मिरपूड टाकून प्यावे.

आपल्याला मोसंबी खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फूड एन डी टी व्ही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *