vajan niyantrit theva
- आरोग्य

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काही सोपी योगासने

वजन कमी करण्यासाठी फक्त जेवण कमी करणे हाच उपाय नसून त्यासोबतच योगासने, व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रकारचा आहार नियंत्रणात आणून जर तुम्ही रोज काही योगासने केल्यास वजन नियंत्रित राहते.

दररोज योगासने केल्याने आपल्या शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात. योगासने केल्याने आपल्या शरीराची लवचिकता वाढते, प्रतिकारशक्ती सुधारते, चयापचय दर सुधारतो. तणाव कमी होण्यास मदत मिळते.

त्याबरोबरच वजन कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारची योगासने आहेत. ताडासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, नौकासन असे अनेक प्रकारची योगासने करून आपण आपले वजन कमी करू शकता.  

वजन कमी करण्यासाठी नौकासन हा योगा प्रकार उपयुक्त आहे. नौकासन करण्यासाठी पोटावर झोपा. पाय जुळलेले ठेवून हात शरीराजवळ आणा. पूर्ण श्वास सोडून दोन्ही हात व पाय एकाच वेळी जमिनीपासून वर उचला. संपूर्ण बॅलन्स पोटावर येईल अशा स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. काही सेकंदानंतर सावकाश आसन सोडा.

वक्रासन हा योगा प्रकार करताना दोन्ही पाय सरळ पसरून दोन्ही हात जमिनीवर टेकवा. उजवा पाय दुमडून डावा पाय सरळ ठेवा. उजवा हात उजव्या दिशेने वळवून मागे ठेवा. डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा.

मान मागच्या दिशेला वळवत मागे पाहण्याचा प्रयत्न करा. या योगासनांमुळे पोटाच्या स्नायूंना ताण बसून चरबी कमी होण्यास मदत मिळते. वक्रासन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.

कपालभाती प्राणायाम केल्यामुळे वजन कमी होते. डोके, मान सरळ ठेवून हाताने गुडघ्यावर हात ठेवत ध्यान मुद्रित बसावे. डोळे बंद करून शरीर स्थिर अवस्थेत ठेवावे. लांब श्वास घेत पोटाचे मसल्सवर ताण येईल अशा पद्धतीने श्वास आत बाहेर करा. यामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात आणि चरबी कमी करण्यासाठी मदत होते.

परिणामी वजन आपोआप घटण्यास मदत मिळते. कपालभाती प्राणायाम केल्यामुळे आपला चयापचय दर वेगाने वाढतो. परिणामी आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. कपालभाति प्राणायाम आपल्या मनाला शांत करतो.

भुजंगासन या योगा प्रकारामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. पोटावर झोपून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडतील अशा अवस्थेमध्ये ठेवा.

हनुवटी फरशीवर टेकवुन हाताचे कोपरे कमरेला लावा आणि हातांच्या आधारे कमरेपासून पुढचा भाग वरती उचला. काही वेळात पुन्हा प्रथमावस्थेत या. हे आसन केल्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच भुजंगासन केल्याने पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत मिळते.

पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोपण्यापूर्वी काही वेळ शांतपणे ध्यान करा, आनंद देणारं संगीत ऐका, कोमट पाण्यानं आंघोळ करा. असे केल्याने चांगली झोप लागते. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही.

आपल्याला वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काही सोपी योगासने हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही.

कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फूड एन डी ती व्ही, टाईम्स नाऊ आणि वेक फिट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *