badishep khanyache fayde
- आरोग्य

जेवनानंतर चिमुटभर बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जेवण केल्यानंतर खालेल्या अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन होण्यासाठी बडीशेप उपयुक्त असते इतकाच त्याचा उपयोग माहीत असतो. बडीशेपमध्ये व्हिटॅमीन सी, कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी शरीराला आवश्यक खनिज असतात. चला तर मग जाणून घेऊया बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

जेवनानंतर चिमुटभर बडीशेप खाल्याने तोंडाचा दुर्गंध दूर होण्यास मदत मिळते. जेवनानंतर चिमुटभर बडीशेप खाल्याने सारखी लघवी लागत असेल तर तिच्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. याबरोबरच शरीरातील अनावश्यक विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.

दररोज बडीशेप खाल्ल्याने दृष्टी चांगली होते. प्रत्येक दिवशी 5-6 ग्रॅम बडीशेप खाण्याने डोळे निरोगी राहतात. नियमीतपणे थोडीशी बडीशेप खाल्ल्याने चयापचय दर सुधारण्यास मदत होते आणि अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अशा गोष्टी पासून आराम मिळण्यास मदत मिळते. 

नियमीतपणे थोडीशी बडीशेप खाल्ल्याने शरीरात चयापचय दर वाढतो आणि चरबी कमी होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. खोकला येत असल्यास मधात बडीशेप मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकला कमी होईल.

तळपायांची जळजळ होत असल्यास ग्लासभर पाण्यात चमचाभर बडीशेप आणि चमचाभर अख्के धणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाणी गाळून घ्या. थोडीशी खडीसाखर मिसळून हे प्या. असे आठवडाभर केल्याने पायाची होणारी जळजळ थांबू शकते.

मळमळ होत असेल नियमित जेवणानंतर बडीशेप खावी. त्यामुळे पचन होण्यात मदत होते आणि मळमळही थांबते. उन्हाळी लागल्यास चमचाभर बडीशेप खा आणि त्यावर एक ग्लास पाणी प्या.

असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल. लघवी करताना होणारी जळजळ थांबण्यास मदत मिळेल. बडीशेप मध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात, ज्यामुळे कफ सारख्या समस्यापासून मुक्त होण्यास मदत होते.

आपल्याला जेवनानंतर चिमुटभर बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *