आपल्या डोळ्यांखाली असणारी त्वचा खूप पातळ आणि संवेदनशील असते. उन्हात राहिल्यामुळे, कोरड्या त्वचेमुळे अती झोपेमुळे, वाढत्या वयामुळे आपल्या डोळ्यांखाली असलेल्या त्वचेवर त्वरीत परिणाम होतो आणि सुरकुत्या पडतात. याबरोबरच एका ठराविक वयानंतर डोळ्याखाली सुरकुत्या दिसायला लागतात.
सुरकुत्यामुळे चेहऱ्याची सुंदरता बिघडते. तसेच आपला आत्मविश्वासही कमी होतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. डोळ्यांखाली येणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय.
डोळ्यांखालील सुरकुत्या कमी करण्यासाठी कोरफडाचा गर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हा गर तुमच्या सुरकुतलेल्या त्वचेवर लावा. १० मिनीटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कोरफडामध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करणारे गुणधर्म असतात.
डोळ्यांखाली येणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी एक ताजा टोमॅटो घ्या अन मिक्सर मध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये काही थेंब गुलाबपाणी मिसळून डोळ्यांखालच्या त्वचेवर कापसाने लावा. ५ ते १० मिनिटं तसाच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. या उपायाने तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा तजेलदार होईल.
सुरकुत्या घालवण्यासाठी एक चमचा मध घ्या. त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. हे मिश्रण नियमितपणे चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
डोळ्यांखालील सुरकुत्या घालवण्यासाठी आपण त्यावर अंड्यातील पांढरा बलक त्यावर लावू शकता. यासाठी एक अंडे फोडून त्यातील पांढरा बलक एका वाटीत काढून घ्या.
आता तो बलक हलक्या हाताने सुरकुत्या असलेल्या ठिकाणी लावा. साधारण पणे 15 मिनिटे राहूद्या त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.
डोळ्यांखालील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाचे तेल आणि मध एकत्र करा आणि ते सुरकुत्यावर लावा. या मिश्रणाच्या नियमित वापरामुळे सुरकुत्या नाहीशी होण्यास मदत होईल.
डोळ्यांखालील सुरकुत्या घालवण्यासाठी काकडीचे काप घ्या किंवा काकडी किसून घ्या आणि फ्रीझरमध्ये सुमारे 45 ते 50० मिनिटे थंड होऊ द्या. नंतर थंड झालेल्या काकडीला सुरकुत्या असलेल्या जागेवर लावा साधारणपणे 10 मिनिटे ठेवा. जलद परिणामासाठी दिवसातून दोनदा हा उपाय करा.
पपईचा वापर करून आपण अगदी सहज डोळ्यांखालील सुरकुत्या दूर करू शकतो. यासाठी 1 पिकलेल्या पपईची फोड मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. 15 मिनिटांसाठी सुरकुत्या असलेल्या जागेवर लावा.
त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. असं केल्याने डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा तजेलदार होईल. पपईमध्ये ब्रोमिलेन नावाचं एंजाइम असतं. ज्यामध्ये अन्टी-इन्फेमेटरी गुणधर्म असतात. जे आपल्या त्वचेला हायड्रोसी असिड देतं.
सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचा निरोगी, मऊ आणि तजेलदार राहण्यासाठी आपण चांगल्या गोष्टी खाणे आणि शक्य तितके पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय पुरेशी झोप घ्या आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
आपल्याला डोळ्यांखाली येणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फेमिना ब्युटी.