आज-काल बहुतांश लोकांमध्ये, विशेषतः स्त्रीयांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसुन येते. हिमोग्लोबिन म्हणजेच लोह आणि प्रोटीन पासून बनलेला असतो. रक्ता्मध्ये कमीतकमी 12 ते 14.5 मिली इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यक असते.
हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारी एक प्रथिने आहे. ह्या पेशी शरीरात ऑक्सिजन वहनाचे काम करतात. हिमोग्लोबिन हे लोह समृद्ध प्रथिने असून संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वहनास जबाबदार असते.
पौष्टिक आहार नसेल तर रक्तातील लोह कमी होऊ शकत. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकता.
हिमोग्लोबिनचे प्रमाण वय आणि लिंगानुसार वेगवेगळं असतं. नवजात बालकामध्ये हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण १७ ते २२ असू शकतं, लहान मुलांमध्ये हे प्रमाण ११ ते १३ असायला हवं. प्रौढ वयातील महिलांमध्ये याचे हिमोग्लोबिन १२ ते १६ तर पुरुषांमध्ये हे प्रमाण १४ ते १८ असणे गरजेचे आहे.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणात गोळ्या खातात परंतु त्यामुळे काही कालावधीसाठी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते परंतु जर आपण घरगुती पद्धतीने योग्य आहार घेऊन हिमोग्लोबिन वाढवले तर त्याचा फायदा दीर्घ काळासाठी होऊ शकतो. जर तुमच्या शरीरात देखील रक्ताची कमी असेल तर आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या.
हिमोग्लोबिनची पातळी कमी झालेल्या व्यक्तीस जास्त लोहयुक्त पदार्थ खाण्यामुळे फायदा होऊ शकतो. हिरव्या पालेभाज्याचे सेवन करा. पालक हे आयुर्वेदामध्ये रक्तवर्धक म्हणून समजले जाते. पालकमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते त्यामुळे रोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवा.
गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. आयुर्वेदात गुळाला ‘औषधीय शर्करा’ म्हणून संबोधलं जाते. गूळ लोहवर्धक असून उत्तम स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
गूळाच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जा देखील मिळते. बीटामध्ये फोलेटचे प्रमाण सर्वात जास्त असते.
म्हणूनच हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बीटाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी तुम्ही बीट खाण्यामुळे मिळू शकतात. शंभर ग्रॅम बीटामधून जवळजवळ 0.8 मिलीग्रॅम लोह मिळते.
शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आपल्या आहारात बीट, डाळिंब, सफरचंद यांचा समावेश करा. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दुध आणि खजूर खाणे उत्तम उपाय आहे.
हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दुध प्यावे. दुध प्यायल्या नंतर खजूर खावे. खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते, परिणामी हिमोग्लोबिन वाढते.
खजूर नुसताच खाण्याबरोबरीने त्यापासून तयार केलेली बर्फी , लाडू किंवा चटणी असे विविध पदार्थांमार्फत तुम्ही खजूर खाऊ शकता. शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खा.
कोळंबी, सुरमई, बांगडा असे मासे आहारातून जरूर खा. ज्यामुळे तुमच्या शरीराला मुबलक लोह मिळेल. चिकन, मटण, अंडी, मासे यामधील व्हिटामिन ‘बी १२’ व व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.
आपल्याला शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.