हाडे बळकट करण्यासाठी आहारात कोण कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे
- आरोग्य

हाडे बळकट करण्यासाठी आहारात कोण कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे?

शरीराची रचना पाहता हाडांचे कार्य खूप महत्वाचे आहे. हाडे आपल्या शरीराला फक्त आधार देत नसून त्यामुळे आपली हालचाल व्यवस्थितरीत्या होते. हाडांच्या बळकटीकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे.

हाडे कुमकुवत असतील तर सांधेदुखी, फॅक्चर होणे, अंग दुखणे असे त्रास उदभवतात. हाडे मुख्यतः कॅल्शियम आणि मिनरल्सपासून बनतात तसेच व्हिटॅमिन डी हाडांच्या पोषणासाठी गरजेचे असते. आज आपण जाणून घेऊयात हाडांच्या बळकटीसाठी कोणता आहार घ्यावा.

हाडांमध्ये मुख्यतः कॅल्शियम हा घटक असतो. दूध व दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही, ताक, पनीर, लोणी, तूप यातून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. एक कप दुधात 280 मिलीग्राम कॅल्शियम असते म्हणून रोजच्या आहारात किमान एक कप दूध घ्या.

सुका मेवा हे पोटॅशियम, ओमेगा ३ फॅटी असिड तसेच कॅल्शियम आणि प्रोटिनचे उत्तम स्रोत आहेत. यातील बदाम आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात कॅल्शियम पुरवते. रोज नियमित 7 – 8  बदाम खाल्ल्यास हाडे कमजोर होणार नाही. बदामाबरोबर दुधाचे सेवन केल्यास अधिक फायदा होईल.

हाडांच्या मजबुतीसाठी  आहारात नारळ, सीताफळ, पेरू, आंबा, संत्री अशा फळांचा ही समावेश करू शकता. या फळांमध्ये पुरेसे कॅल्शियम असते. हाडे बळकट करण्यासाठी आपल्या आहारात अक्रोडचा समावेश करा. अक्रोडामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.

आपल्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा  समावेश करा. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये पुरेसे  कॅल्शियम असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात मजबूत राहतात. याव्यतिरिक्त, आपल्याला मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळते.

अननस आपल्याला हाडांच्या बळकटी बरोबर इतर हाडांच्या आजारांपासून देखील वाचवतो. अननस मधील ब्रोमोलिन हा घटक हाडांना निरोगी ठेवतो. यातील मॅग्नेशियम हाडांना बळकट करण्यास मदत करतो.

वाढत्या वयात मुलांना सोयाबीन खायला दिले तर त्यांची हाडे मजबुत होण्यास मदत मिळते. तसेच गर्भवती स्त्रीयानी आहारात सोयाबीनचा समावेश करावा सोयाबीनमुळे गर्भाचा चांगल्याप्रकारे विकास होतो.

आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा अधिकाधिक समावेश करा. यातून मिळणारे व्हिटॅमिन डी हाडांना बळकट करण्यास मदत करतात. त्याबरोबर त्यांना निरोगी देखील ठेवतात.

मांसाहार जसे मासे, अंडी, मटण यातून मुबलक प्रमाणात शरीराला प्रोटीन मिळते. यातील कॅल्शियम व व्हिटॅमिन डी मुळे हाडांच्या ढीसुळपणा निघून जातो व हाडे बळकट होतात.

हाडांच्या मजबुतीसाठी आहारा बरोबरच व्यायामाची हि गरज असते. म्हणूनच आपण हाडांच्या मजबुतीसाठी थोडा वेळ का होईना शारीरिक कसरत केली पाहिजे.

आपल्याला हाडे बळकट करण्यासाठी आहारात कोण कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे ? हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *