sakali kapbhar jiryache pani pinyache fayde
- आरोग्य

सकाळी कपभर जिऱ्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

स्वयंपाक घरात रोजच्या वापरातील असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्याला निरोगी ठेवतात. अपचन गॅस सारख्या अनेक समस्या सोडवणारे जिरे त्यापैकीच एक. जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर भरपूर प्रमाणात असतात.

जिरे फक्त अन्नाची चव वाढवत नाही तर अनेक आजारांवर औषध म्हणून काम करते. आज आपण जाणून घेणार आहोत. जिऱ्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे.

जिरे कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवते त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास जिरे फायदेशीर आहे. एक चमचा जिरे एक कप पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी त्या पाण्यात थोडा लिंबाचा रस घालून ते पाणी वस्त्रगाळ करून प्या. जर तुम्ही दररोज असे केले तर तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.

पाण्यामध्ये जिरे काही तास भिजवून ठेवल्याने ‘ओस्मोसीस’ या नैसर्गिक प्रक्रियेमुळे जिरे पाणी शोषून घेते. आणि थोडेसे फुगतात. भिजवल्यामुळे  जिऱ्यामध्ये असलेली गुणकारी तत्वे त्या पाण्यामध्ये उतरतात आणि पाणी पिवळ्या रंगाचे दिसू लागते.

जिऱ्यात व्हिटॅमिन ई चे प्रमाण मुबलक आहे यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. जिऱ्याचे पाणी रोज घेतल्यास चेहरा उजळतो. यातील अँटी फंगल गुण त्वचेच्या समस्यांवर फायदेशीर ठरतात.

जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंट मुबलक प्रमाणत असतात ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. जेवण झाल्यावर एक चिमूट जिरे खाल्ल्याने अपचनाचा त्रास होत नाही. यातील पोषक तत्वे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात.

पावसाळा हिवाळा या दिवसात हमखास सर्दीचा त्रास होतो. यात अँटीसेप्टीक गुण असल्याने हे सर्दीला चांगले औषध आहे. जिरे चांगले भाजून कापडात पुरचुंडी बनवून घ्या. हे अधून मधून हुंगत रहा याने नाक मोकळे होऊन सर्दीचा त्रास कमी होतो.

जिऱ्यामधील फायबर आपले पोट साफ ठेवते. ज्यांना बद्धकोष्टतेचा त्रास आहे त्यांनी ग्लासभर ताकात जिरे व काळे मीठ टाकून प्या. चिमूटभर कच्च्या जिऱ्यामुळे पित्ताचा त्रासही कमी होतो. यातील मोलाटोनीन पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करते. जीऱ्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

आपल्याला सकाळी कपभर जिऱ्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फार्मइजी ब्लॉग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *