gul ani futane khanyache fayde
- आरोग्य

फुटाणे आणि गूळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

पूर्वी गूळ फुटाणे घराघरात आवर्जून खाल्ले जात असत. अलीकडे फास्ट फूडमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. गूळ व फुटाणे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याच काम करतात. गूळ व फुटाणे आपल्या शरीराचे मेटाबॉलिजम वाढवते, तसेच यात विविध व्हिटॅमिन, पोटॅशियम, अमीनो एसिड, सेरोटोनिन व लोह मोठ्या प्रमाणात असते जे आपल्या शरीराला हृदयरोग, लठ्ठपणा, रक्ताची कमतरता, ताणतणाव अशा अनेक समस्यांपासून दूर ठेवते. गूळ फुटाणे यातून आपल्या शरीराला काय काय फायदे होतात हे आज पाहूया.

गूळ आणि फुटाण्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात जे आपल्या शरीराच्या स्नायूंना बळकट करत. तुम्ही व्यायाम करत असाल तर प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. हे तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करते.

गुळ आणि फुटाण्यात झिंक मुबलक प्रमाणात असते हे आपल्या त्वचेवरील समस्यांवर प्रभावीपणे काम करते. याचे नियमित सेवन केल्याने चेहरा उजळलेला दिसेल.

भाजलेल्या फुटाण्यामध्ये फायबर असल्याने भाजलेले फुटाणे खाल्ल्याने पचन क्रिया सुधारून पोट साफ होण्यास मदत होईल. बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत  मिळेल.

गूळ आणि फुटाण्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. गुळ आणि फुटाणे खाल्याने हाडासोबत आपले दात मजबूत होण्यास मदत मिळते.

गुळ आणि फुटाणे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढते. गूळ फुटण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते जे आपल्या शरीरातील रक्त वाढीसाठी मदत करते. गूळ आणि फुटाणे यातील कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स तसेच फॉस्फरस आयर्न रक्ताच्या नवीन पेशी तयार करतात.

शक्तीबरोबर बुद्धीलाही गुळ आणि फुटाणे फायदेशीर आहेत. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी यासारखा सोपा उपाय दुसरा नाही. यांच्यातील व्हिटॅमिन बी तुमची स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते.

लहान मुलांना गूळ फुटाणे आवर्जून खाण्यास द्यावेत. व्यायाम केल्यानंतर गूळ फुटाणे खाल्याने शरीराची उर्जा पातळी वाढविण्यास मदत मिळते.

गूळ फुटाणे तुमच्या हृदयाला निरोगी ठेवते. यात असलेलं पोटॅशियम हृदयाचे आरोग्य सदृढ ठेवते तसेच यामुळे मेटाबॉलिक रेट उत्तम रहातो त्यामुळे लठ्ठपणावर देखील नियंत्रण मिळवता येते.

फुटाणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते. वातावरणातील बदलामुळे होणारा सर्दी-पडसे, खोकला यासारख्या आजारांपासून आपला बचाव होतो. यातील फायबर तुमची पचनक्षमता वाढवते.

भाजलेले फुटाणे खाताना एक काळजी अवश्य घ्या ती म्हणजे बारीक चावून खा म्हणजे गैसेस होणार नाहीत. अन मुठभर फुटाण्यापेक्षा जास्त फुटाणे एकावेळी खाऊ नका. 

आपल्याला फुटाणे आणि गूळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडियन एक्सप्रेस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *