pot saaf honyasathi gharguti upay
- आरोग्य

पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल प्रत्येकाचे आहार व दिनचर्या पाहता ही समस्या कोणालाही होऊ शकते. खऱ्या अर्थाने पाहिले तर ही समस्या अत्यंत गंभीर आहे. यामुळे गॅस, भूक न लागणे, पोट फुगणे, मळमळ होणे या सारख्या बऱ्याच  आजारांचा जन्म होतो. या आजाराचे दु: ख फक्त त्यांनाच ठाऊक आहे जे त्यापासून त्रस्त आहेत.

म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही सोपे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. ज्याच्या सहाय्याने तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येतुन अगदी सहज आणि थोड्या काळामध्ये मुक्त होऊ  शकता.

बद्धकोष्ठतेसाठी गरम पाणी हे सर्वोत्तम उपचार आहे. जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठता तेव्हा काही न खाता एक ग्लास गरम पाणी प्या. असे केल्याने आपली बद्धकोष्ठतेची तक्रार कायमची  दूर होइल.

आपल्या सर्वांना हे माहितच आहे की पालक खाण्याने बरेच फायदे होतात, यामुळे आपली दृष्टी वाढते तसेच त्वचा चमकते. पालकाच्या पानाचा रस या समस्येसाठी खूप फायदेशीर आहे. दररोज अर्धा ग्लास पालकाच्या पानाचा रस पिल्याने आपला आजार मुळापासून दूर होण्यास मदत होईल.

दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास ताक प्यायची सवय लावा. ताकामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक घटक असतात जे आपल्या आतड्यांवर चांगला परिणाम करतात. आणि ताकाचे सेवन केल्याने आपले पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत मिळते.

रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा मध कोमट पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पोट साफ होते. पेरू आणि पपई  ही दोन्ही फळे  नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होईल.

या फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. ही दोन्ही फळे आपल्या आंतड्यांना ताकद  देतात आणि हा या आजाराचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपचार आहे.

दहयामध्ये बरेच चांगले बॅक्टेरिया असतात जे आपल्या शरीरास निरोगी ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही दररोज सकाळी थोडेसे दही खाल्ले तर लवकरच तुम्हाला या आजारापासून मुक्ती मिळेल.

रात्री झोपण्या अगोदर थोडेसे एरंडी तेल पिण्यामुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होते. दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते पाणी प्या, यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल आणि तुम्हाला चांगले वाटेल.

आवळा खाल्याने अपचणाची समस्या दूर केली जाऊ शकते. रोज रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा आवळा पावडर सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.

कोरफड हे आपल्या आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी नैसर्गिक औषध आहे. पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी आपण रात्री झोपण्याआधी थोड्याश्या कोरफडाचे सेवन करा. कोरफडाचे सेवन केल्याने पोटातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.

आपल्याला पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडिया टाईम्स आणि स्टाईल क्रेझ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *