चेहऱ्यावर पिंपल्स ही समस्या मुल आणि मुली दोघांमध्येही आढळते. पिंपल्स तेलकट त्वचेवर जास्त येतात. पिंपल्स येण्याची बरीच कारण आहेत. वाढते प्रदूषण आणि धूळ चेहरा खराब करत असतात, चहा, कॉफी जास्त प्यायल्याने, वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे सुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात.
याबरोबरच सूर्याच्या तीव्र किरणांचा चेहऱ्याच्या नाजूक त्वचेवर वाईट परिणाम होतो आणि चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. चला तर आज आपण चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय जाणुन घेउयात.
दररोज जास्तीत जास्त पाणी प्या, असे केल्याने आपल्या शरीराच्या अशुद्धी बाहेर येऊ लागतील आणि चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत मिळेल.
पिंपल्स तेलकट त्वचेवर जास्त येतात. म्हणून तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करा. तेलाचे पदार्थ सेवन केल्याने त्वचेच्या तेलाची पातळी वाढते आणि पिंपल्सची समस्या देखील वाढू शकते.
दिवसातून 2-3 वेळा आपला चेहरा धुवा. असे केल्याने चेहऱ्यावर जमा होणारी धूळ घाण आणि साफ होईल आणि पिंपल्स कमी होण्यास मदत मिळेल.
चेहऱ्यावरील पिंपल्सना पुन्हा पुन्हा हात लावू नका. असे केल्याने हातात असलेला बॅक्टेरिया तुमच्या चेहऱ्यावर जातात. ज्यामुळे आपल्याला पिंपल्स होऊ शकतात.
पिंपल्स कमी होण्यासाठी कडुलिंबाची स्वच्छ पाने बारीक करून घ्या आणि त्यातून काढलेला रस चेहऱ्यावर लावा. साधारण १० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका. असे केल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत मिळेल. कडुलिंबाचा रस पिल्याने सुद्धा पिंपल्स कमी होतात. कडुलिंबाची पाने त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे.
हळद त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि त्वचेशी संबंधित आजारांपासून मुक्त होण्यासाठी शतकानुशतके वापरली जाते. पाण्यात किंवा दुधात थोडी हळद मिसळा आणि मुरुमांवर लावा आणि नंतर १० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतील. कोरफडाचा रस चेहऱ्यावर लावल्याने सुद्धा पिंपल्स कमी होतील.
आपल्याला चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा.
इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आपल्याला अजुन कोणत्या विषयावर माहिती वाचायला आवडेल ते आम्हाला फेसबुकपेज वर मेसेज करून सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.