- आरोग्य

भुवया (आयब्रो) दाट बनविण्यासाठी सोप्या टिप्स

बऱ्याचदा काहीजणांच्या भुवया विरळ असतात. भुवयावरील केस दाट असतील तर आपला चेहरा आकर्षक  दिसत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत. भुवया दाट बनविण्यासाठी सोप्या टिप्स.

एरंडीचे तेल हा भुवया दाट करण्यासाठी  एक जुना आणि सर्वात प्रभावी उपाय आहे. एरंडीच्या तेलामध्ये असणारी प्रथिने, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे आपल्या केसांच्या रोमांना पोषण देण्यास मदत करतात.

भुवया दाट बनविण्यासाठी अर्धा चमचा नारळाचे दूध आणि अर्धा चमचा एरंडाचे तेल घेऊन ते एकत्र करा. रात्री झोपताना मस्कारा लावण्याच्या ब्रशने. भुवयांवर हे मिश्रण लावा. नियमित हा उपाय केल्याने आपल्या भुवया दाट होतील.

भुवया दाट बनविण्यासाठी पाण्यात रात्रभर मेथीचे दाणे भिजवा सकाळी त्या मेथी दाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करा. आंघोळ करण्यापूर्वी ही पेस्ट भुवयांवर लावा. आपण या पेस्टमध्ये बदामाचे तेल ही मिसळून लावू शकता. या पेस्टमुळे भुवयांचे केस दाट होण्यास मदत होते.

अंड्यातील पिवळया बलका मध्ये आढळणारे सिलेनियम भुवया दाट होण्यास मदत करते. अंड्यातील पिवळ बलक आठवड्यातून 2 वेळा भुवयावर 5 मिनिटे लावा. यानंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या.

कोरफडीचा गर आपल्या भुवईवर लावा. 10 मिनिटे सुकू द्या नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. असे नियमित केल्याने आयब्रो द्रुतगतीने दाट होण्यास मदत होईल.

भुवया दाट बनविण्यासाठी रात्री झोपण्याआधी हातावर थोडेसे नारळाचे तेल घ्या. अन हलक्या हाताने या तेलाने आपल्या भुवईवर मालिश करा. असे केल्याने आपल्या भुवया दाट होण्यास मदत मिळेल.

भुवया दाट बनविण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी कापसावर थोडासा कांद्याचा रस घ्या अन तो भुवयांवर लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

कांद्यामध्ये सेलेनियम आणि सल्फरचं प्रमाण अधिक असतं. यामुळे भुवयांवरील केसांची वाढ होण्यास मदत मिळेल. भुवया दाट बनविण्यासाठी दालचिनीच्या पावडरमध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा.

त्यानंतर तयार केलेली पेस्ट आपल्या भुवयांवर १५ मिनिटे लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हा उपाय नियमितपणे केल्याने आपली भुवया दाट होण्यासाठी मदत होईल.

आपल्याला भुवया (आयब्रो) दाट बनविण्यासाठी सोप्या टिप्स हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आपल्याला अजुन कोणत्या विषयावर माहिती वाचायला आवडेल ते आम्हाला फेसबुक पेज वर मेसेज करून सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *