- आरोग्य

केसांना कांद्याचा रस लावण्याचे फायदे

सुंदर आणि घनदाट केस सर्वांनाच हवे असतात. कांद्याचा रस केसांना  लावल्याने केस वाढतात. आपल्याला सुंदर आणि निरोगी केस हवे असल्यास केसांना कांद्याचा रस लावायला सुरू करा.

कांद्याचा रस आपण अनेक प्रकारे केसांना लावू शकतो. कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे केसांची वाढ पटकन होते. चला तर मग कांदा केसांना लावल्यानंतर काय काय फायदे होतात हे पाहूयात

जर आपल्याला लांब केस हवे असतील तर आठवड्यातून किमान दोनदा आपण कापसाच्या मदतीने कांद्याचा रस लावू शकतो. कांद्याचा रस नारळाच्या तेलात मिक्स करा आणि केसांवर 15 मिनिटे ठेवा आणि नंतर शैम्पू करा. असे केल्याने केसांची चांगली वाढ होते.

कांद्याच्या रसामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस वाढण्यास आणि केस दाट होण्यास मदत मिळते. आपले केस लांब आणि जाड आहेत परंतु आपल्याला पाहिजे असलेली चमक केसांवर येत नसेल तर केसांना कांद्याचा रस लावा.

यासाठी आपल्या केसांच्या लांबीनुसार कांद्याचा रस आणि नारळ तेल समान प्रमाणात घ्या आणि त्यामध्ये ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब मिसळा. आठवड्यातून दोनदा 30 मिनिटे मुळांसह संपूर्ण केसांवर लावल्याने लवकर फरक दिसेल.

कांद्याच्या रसात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुण असतो. जेव्हा आपण हे केसांच्या मुळांमध्ये म्हणजे टाळूवर लावु तेव्हा हे डोक्याच्या त्वचेमध्ये कोणताही बुरशीजन्य संसर्गास वाढू देत नाही. यामुळे आपल्या टाळूची त्वचा निरोगी होते आणि केसांची चांगली वाढ होते.

कांद्यामध्ये तीव्र वास असतो. हे केसांना लावल्यानंतर शाम्पू केल्यावर ही केसांचा वास जात नाही. तेव्हा केस कोरडे झाल्यावर आपण 2 ते 3 चमचे गुलाबपाणी केसांना लावावे. वास निघून जाईल.

कांदयाचा रस केसांना लावल्याने केसांना पुरेसे पोषण मिळते. केसांची मूळ मजबूत होण्यास मदत होते. कांदा हा अ‍ॅन्टीबॅक्टीरियल असल्याने टाळूवरील संसर्गसुद्धा कांदयाचा रस लावल्याने प्रतिबंधित होण्यास मदत मिळते. केस गळती रोखता येऊ शकते.

आपल्याला केसांना कांद्याचा रस लावण्याचे फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *