- आरोग्य

डार्क सर्कल्स घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

डोळ्याभोवती येणारे डार्क सर्कल्स आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. कुणालाही डोळ्याभोवती येणारे डार्क सर्कल्स आवडत नाहीत. साधारणता: कमी झोप घेत असल्यास डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येत असतात.

याबरोबरच हार्मोन्समधील बदल, बराच वेळ टीव्ही किंवा संगणकाच्या स्क्रीनसमोर बसून राहिल्याने हि डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येऊ शकतात. आज आपण डार्क सर्कल्स घालवण्यासाठी सोप्या घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

डोळ्याभोवती येणारे डार्क सर्कल्स दूर करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग टोमॅटो आहे. टोमॅटो नैसर्गिकरित्या डोळ्याभोवती येणाऱ्या डार्क सर्कल्सला दूर करण्याचे कार्य करते. यासाठी आपण एक चांगले पिकलेले टोमॅटो घ्या.

ते मिक्सरमध्ये बारीक करून तयार मिश्रणामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आता हे मिश्रण डोळे बंद करून आपल्या डोळ्याभोवती काळजी पूर्वक चोळा. 10 मिनिट राहूद्या नंतर थंड पाण्याने धुऊन टाका. काही दिवस हा उपाय केल्याने आपल्या डोळ्याभोवती असणारे डार्क सर्कल्स नाहीसे होईल.

डोळ्याभोवती येणारे डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काकडी अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवा. नंतर त्या काकडीचे काप कापून घ्या. आणि डोळ्यावर आणि डोळ्याभोवती 15 मिनिटासाठी ठेवा. नंतर डोळे धुवा. असे केल्याने आपल्याला ताजे वाटेल आणि काही दिवसात डोळ्याभोवती असणारी डार्क सर्कल्स देखील कमी होऊ लागतील.

डार्क सर्कल्स घालवण्यासाठी पिकलेल्या पपईचा गर मिक्सरमध्ये बारीक करून हे मिश्रण डोळे बंद करून आपल्या डोळ्याभोवती काळजी पूर्वक चोळा. 10 मिनिट राहूद्या नंतर थंड पाण्याने धुऊन टाका. काही दिवस हा उपाय केल्याने आपल्या डोळ्याभोवती असणारे डार्क सर्कल्स नाहीसे होईल.

डार्क सर्कल्स घालवण्यासाठी एक बटाटा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या वस्त्रगाळ पद्धतीने त्याचा रस वेगळा करा त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण डोळे बंद करून काळजीपूर्वक कापसाच्या मदतीने डोळ्याभोवती चोळा. 10–15 मिनिटे राहूद्या त्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने डार्क सर्कल्स जाण्यास मदत मिळते.

बदामांमध्ये भरपूर व्हिटॅमिन ई आढळते. ज्याच्या मदतीने आपण डार्क सर्कल्स घालवू शकता यासाठी रात्री झोपण्याआधी काळजीपूर्वक डोळ्याभोवती थोडेसे बदाम तेल लावून हलक्या हाताने मालिश करा. सकाळी उठून डोळे थंड पाण्याने चांगले धुवा. असे केल्याने काही दिवसात डार्क सर्कल नाहीसे होतील. 

आपल्याला डार्क सर्कल्स घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन आणि फार्म इजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *