- आरोग्य

घरातील माशा घालवण्यासाठी घरगुती उपाय

घरमाशा घरात  येऊ नये म्हणून आपण घर स्वच्छ ठेवतो किंवा दरवाजे बंद ठेवतो. असे असूनही घरमाशा घरात येतातच घाणीवर बसलेल्या माश्या उघड्या खाद्यपदार्थांवर बसतात आणि जर आपण तेच खाल्ले तर अनेक प्रकारचे रोग उद्भवतात जे कधीकधी आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. अशा या माश्याना घरापासून दूर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

घरातील माशा घालवण्यासाठी घरामध्ये भीमसेनी कापूर जाळून त्याचा धूर प्रत्येक खोलीमध्ये पसरवा. असे केल्याने घरातील माशाची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.

 सायंकाळच्या वेळेस धूप पेटवा. तसेच पेटत्या धूपामध्ये कापराच्या वड्या टाकल्यास माशा निघून जातात. घराच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवा. खिडक्यांना जाळी लावा, मच्छरदाणी लावा. घरात पंख्याचा वापर करा.

आपल्याला तुळशीच्या पानांच्या औषधी गुणधर्मांविषयी माहिती आहे आणि तुळशीचा हा वनस्पती आपल्या घरात माशा गोळा होण्यासही रोखू शकतो, म्हणून आपल्या घरात तुळशीचा रोप लावा आणि माश्यांची समस्या बऱ्याच  प्रमाणात कमी होते.

घरामध्ये ज्या ठिकाणी माश्यांचा वावर जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी लवंग तेल शिंपडा. लवंग तेलाच्या वासामुळे माशा घरात येत नाही.

काकडीचा वापर घरातील माशा घालवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. त्यासाठी काकडी कचऱ्यावर ठेवा. असे केल्याने माशा कचऱ्या पासून पळून जात असल्याने कचऱ्यामध्ये अंडी घालू शकणार नाहीत.

घराच्या कोपऱ्यात नीलगिरीचे तेल फवारणी केल्यास माशा हळूहळू कमी होऊ लागतील. आपल्या घरात माश्या येऊ नये यासाठी घराची खिडक्या, दारे योग्यप्रकारे बंद करत जा. 

घरामधील कचरा झाकण असलेल्या कचराकुंडीत टाकत चला. जेणेकरून तसेच बाहेर सुद्धा कचरा उघड्यावर टाकू नका. माश्या मुख्यत कचऱ्यावर बसतात. घरामधील खाण्याचे पदार्थ हवाबंद कंटेनरमध्ये व्यवस्थित साठवा.

स्वयंपाकघरामध्ये खरकटे सांडू नका. खरकटी भांडी लगेच धुऊन टाकत जा. त्यावर सुद्धा माश्या घोंगावत असतात. माशा प्रकाशात आकर्षित होतात. म्हणून शक्य असेल तेव्हा रात्री बाहेरचे दिवे बंद करा.

उंदीर मारण्यासाठी उंदीर विषाचा वापर टाळा, कारण माश्या मेलेल्या उंदरावर जाऊन बसतात आणि तश्याच आपल्या घरात येतात. त्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात. म्हणून उंदीर मारण्यासाठी उंदीर विषाचा वापर टाळा.

घरात माशा आल्यास त्या त्यांच्यासोबत वेगवेगळे आजार हि घेऊन येत असतात. वरती दिलेले उपाय केल्याने घरात माश्या येण्याचे प्रमाण कमी व्हायला मदत मिळेल.

आपल्याला डार्क सर्कल्स घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: टाईम्स ऑफ इंडिया ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *