- आरोग्य

मशरूम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मशरूम एक प्रकारची बुरशी आहे ज्यामध्ये बरेच गुणधर्म आणि पौष्टिक घटक असतात. मशरूममध्ये व्हिटॅमिन-बी 1, बी 2, बी 9, बी 12, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-डी 2 असे पोष्टिक घटक असतात. मशरूममध्ये असलेले घटक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात  मशरूमचे सेवन केल्यास बऱ्याच अडचणींवर मात देखील करता येते.

भारतातील बहुतेक लोकांना मशरूमची भाजी खायला आवडते. साधारणपणे भारतामध्ये बटण मशरूम सहज उपलब्ध होणारे आणि पोष्टिक घटक युक्त असतात. हे दिसायला भुरकट पांढऱ्या रंगाचे असते.

या व्यतिरिक्त मशरूमच्या अजून हि काही खाण्यायोग्य  प्रजाती असतात ज्या मध्ये वेगवेगळी  पोषक तत्व आढळतात, जी आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे देतात. चला तर जाणून घेऊयात मशरूम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मशरूम हे पूर्णपणे शाकाहारी असते. मशरूम  वर्षभर बाजारात उपलब्ध असते, परंतु हिवाळ्याच्या काळात आपल्याला ते सहज मिळू शकते. त्वचेच्या विविध समस्यांसाठीही मशरूमचा उपयोग फायदेशीर ठरतो.      

मशरूममध्ये अँटीडायबेटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मशरूममध्ये आढळणारे व्हिटॅमिन डी मुरुमांच्या समस्येसाठी औषध म्हणून काम करते. यासाठी मशरूमचे अर्क आपल्या त्वचेवर लावा.

मशरूमचे सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते. अशक्तपणा हे केस गळण्याचे मुख्य कारण असते. रक्तामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा होतो. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळत. म्हणजेच  मशरूमच्या मदतीने आपण केस गळणे देखील रोखू शकता.

कोलेस्टेरॉलच्या बाबतीत मशरूम  खाणे  खूप फायदेशीर आहे. कारण त्यात अनेक घटक आहेत, जे अन्नाचे पचन झाल्यानंतर ते कोलेस्टेरॉल जाळण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या शरीराची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपण मशरूम देखील घेऊ शकता. मशरूम ही एक अशी भाजी आहे ज्यात व्हिटॅमिन डी आढळत.

मशरूममध्ये व्हिटॅमिन बी 2 देखील आढळते, जे दृष्टी आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त, ते निरोगी लाल रक्तपेशींची काळजी घेते जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली होण्यास मदत होइल.

आपल्याला मशरूम खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: वेब एम डी आणि मशरूम कंसील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *