- आरोग्य

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते पपई मध्ये खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या  प्रमाणात उपलब्ध असतात. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. पपई सहज पचणारे फळ आहे.

पिकलेली पपई खाल्याने आपल्या फुफ्फुसाला फायदा मिळतो व आपले पोट साफ राहते. छोट्या मुलांना अतिसारा पासून देखील वाचवते  आणि त्यांची भूक वाढवते.

पपई खाल्याने रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता.

दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच पपई मध्ये असणारे व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी सुद्धा पपई  गुणकारी आहे. पिकेलेल्या पपईचा किस चेहऱ्यावर लावल्यानं चेहरा उजळतो. तसेच पुटकुळ्या, मुरुमे, सुरकुत्या नाहीशा होतात.

पपई हिरड्यांमध्ये रक्त येणे व दातांची कमजोरी दूर करण्यासाठी मदत करते. पपई मुळे आपली पचन क्रिया चांगली होते. आपल्याला पोटाच्या समस्येपासून दूर ठेवतो.

पपईचे नियमित सेवन त्वचेच्या सौन्दर्याकरिता फायदेशीर आहे. तसेच पिकलेल्या पपईच्या गरामध्ये थोडेसे मध घालून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळण्यास मदत होते, त्वचेवर उन्हामुळे आलेला काळसरपणा दूर होतो आणि त्वचेवरील काळे डाग हटण्यास मदत होते.

पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते.

रोजच्या खाण्यात पपईचा वापर तुम्हाला फायदा पोहोचवतो. पपईमध्ये फार कमी कॅलरी असते जे लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. यात फायबरची मात्रा जास्त असल्यामुळे आतड्यांचे आरोग्य उत्तम राहत.

पपईमध्ये व्हिटामिन ‘ए ‘चे प्रमाण चांगले असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ‘ए ‘ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. वयानुसार दृष्टी राहण्यासाठी पपई खाणे फायदेशीर केव्हाही चांगले असते.

एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये साधारण १२० कॅलरीज असल्याने पपई खाल्याने आपले पोट लवकर भरते. याशिवाय पपईमध्ये असणारे फायबर्स भूकेवरील नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त असतात.

शुगरच्या रुग्णांसाठी पपई एक विकल्प आहे. चवीत गोड असली तरी यात शुगरचे प्रमाण फारच कमी असते. जेवणाच्या वेळा बदलणे, काही कारणांनी बाहेरचे खावे लागणे, वातावरणातील बदल यांचा शरीरावर परिणाम होत असतो.

यामध्ये पचनशक्तीवर परिणाम होतो. मात्र पपई खाल्ल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. अनेकदा आपल्याला अवेळी भूक लागते. मात्र पपईने या भुकेवर नियंत्रण मिळविणे शक्य होते.

आपल्याला पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेअल्थलाईन ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *